फेड सेफ्टी टिप्स: 'या' भाजीपाला हॉट क्राफ्ट आहे तर हॉस्पिटलला तोंड द्यावे लागते
आपल्यापैकी अनेकांच्या घरी उरलेली भाजी, भात किंवा इतर पदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. अन्न वाया जाऊ नये म्हणून किंवा वेळ वाचावा म्हणून हा उपाय केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, काही भाज्या आणि पदार्थ पुन्हा गरम केल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात? ( vegetables should not be reheated)
भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्या तरी, काही विशिष्ट भाज्या केवळ एकदाच खाल्ल्या तरच सुरक्षित असतात. त्या पुन्हा गरम केल्यावर त्यांच्या आतले नैसर्गिक घटक बदलतात आणि ते शरीरात विषासारखा परिणाम करू शकतात. अशा पदार्थांमुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, चक्कर येणे आणि काही वेळा फूड पॉयझनिंगसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
काही भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या नायट्रेट (Nitrates) नावाचे घटक असतात. हे घटक पुन्हा पुन्हा गरम केले तर नायट्राइट नावाच्या घातक संयुगांमध्ये बदलतात. हे शरीरासाठी अतिशय धोकादायक मानले जातात. यामुळे रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्याची प्रक्रिया मंदावते आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. लहान मुलांमध्ये याचा अधिक धोका असतो.
पुन्हा गरम करू नयेत ‘या’ भाज्या:
पालक आणि पालेभाज्या
पालक, मेथी, शेपू, मोहरी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. या भाज्या एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम केल्यास त्या पोटासाठी अपायकारक ठरू शकतात. यामुळे उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
बटाटा
बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असतो. बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचे पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यातील घटक बदलू शकतात. तसेच हे पदार्थ जास्त वेळ बाहेर ठेवले तर त्यात घातक जंतू वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
मशरूम
मशरूम खूप पौष्टिक असतात, मात्र ते पुन्हा गरम केल्यास त्यांच्या प्रथिनांची रचना बदलते. त्यामुळे पचनाच्या समस्या, गॅस, पोटात जडपणा आणि उलट्या होऊ शकतात. मशरूम नेहमी ताजे असतानाच खावेत.
अंडी
अंड्याची भाजी, एग भुर्जी किंवा एग करी पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रथिने खराब होतात. यामुळे पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. अंडी शक्यतो तयार केल्यानंतर लगेच खाल्ली पाहिजेत.
फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थही ठरू शकतात धोकादायक:
अनेक जण उरलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात, पण योग्य पद्धतीने साठवण न केल्यास तेही घातक बनू शकतात. पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर गरम केल्यास त्यातील घटक बदलतात आणि ते शरीराला नुकसान करू शकतात. त्याचबरोबर, शिजवलेला भात जास्त वेळ ठेवल्यास त्यात जंतू वाढतात, जे फ्रिजमध्ये ठेवल्यावरही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. असा भात खाल्ल्यास उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. उकडलेले बटाटे किंवा डाळ दीर्घकाळ फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.कापलेली फळे आणि सॅलड जास्त वेळ ठेवू नयेत, कारण त्यात जीवाणू लवकर वाढतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी पदार्थ पुन्हा गरम करणे सोयीचे वाटते, पण चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे उरलेले अन्न खाण्याआधी ते किती सुरक्षित आहे, याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे.
(अस्वीकरण: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Comments are closed.