Detox Water: लिंबू, जिरे, बडीशेप की तुळशीच्या पानांचं पाणी; सकाळी रिकाम्या पोटी काय घेणं जास्त चांगलं?
सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी घेणं शरीरासाठी चांगलं असतं. आजकाल बहुतांश जण सकाळची सुरूवात लिंबू, जिरे, बडीशेपचे पाणी घेऊन करतात. यामुळे शरीराचं चयापचय सुधारते. मात्र या सर्व हर्बल पाण्याचे वेगवेगळे फायदे असतात. त्यापैकी कोणतं पाणी सर्वात जास्त फायदेशीर असतं याबाबत पोषणतज्ञांनी सल्ला दिला आहे. ( Which Detox Water Is Beneficial For Health ? )
लिंबू पाणी
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने चयापचय वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, ते वजन नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे.
जिरे पाणी
रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी घेतल्याने अतिरिक्त चरबी जाळण्यास आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. जिऱ्यामुळे नैसर्गिकरित्या पचनक्रिया सुधारते. जर तुम्हाला पोटाचे त्रास जास्त जाणवत असतील तर जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं.
चिया बियांचे पाणी
चिया बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. पाण्यात भिजवल्यावर ते फुगतात आणि जेलसारखे दिसतात. सकाळी हे पाणी घेतल्याने भूक नियंत्रित राहते. चिया बियांच्या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
बडीशेपचे पाणी
बडीशेपचे पाणी चयापचय क्रिया सक्रिय ठेवण्यास फायदेशीर आहे. जर तुम्हाला पोटात जडपणा, गॅस आणि अपचनाचा त्रास होत असेल तर बडीशेपचे पाणी खूप उपयुक्त ठरतं. यामुळे पोट स्वच्छ होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
तुळशीच्या पानांचे पाणी
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे पाणी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व पाण्यांचे वेगवेगळे फायदे असतात. त्यामुळे तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही पाणी निवडू शकता.
Comments are closed.