Husband Wife Similarity: लग्नानंतर जोडपी एकसारखी का दिसू लागतात? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आपण अनेकदा पाहतो की अनेक वर्षे लग्न झालेलं जोडपं पाहिलं की ते एकमेकांसारखं दिसायला लागतं. चेहरा, हावभाव, बोलण्याची पद्धत, चालण्याची स्टाईल सुद्धा खूपच मिळती-जुळती वाटते. अनेक जण गंमतीत म्हणतात, “हे दोघं तर खरोखरच एकमेकांसारखे दिसतात.” पण हे नेमकं का होतं? (why married couples look alike after years)

लग्नानंतर नवरा-बायको अनेक वर्षे एकत्र राहतात. ते आपलं सुख-दु:ख, अडचणी, आनंद, रडणं-हसणं सगळं काही एकमेकांसोबत शेअर करतात. रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीही दोघांसाठी महत्त्वाच्या होतात. यामुळे दोघांच्या भावना हळूहळू एकसारख्या होऊ लागतात. एकमेकांना समजून घेण्याची सवय तयार होते.

बराच काळ एकत्र राहिल्यावर चेहऱ्यावरचे हावभावही बदलायला लागतात. आनंद, राग, चिंता, हसू या भावना व्यक्त करताना चेहऱ्यावर पडणाऱ्या रेषा, स्माईल करण्याची पद्धत, डोळ्यांचा भाव सुद्धा सारखाच वाटू लागतो. त्यामुळे दोघं दिसायलाही एकमेकांसारखे भासू लागतात.

फक्त दिसण्यातच नाही, तर वागण्यातही बदल होतो. दोघांची बसण्याची पद्धत, चालण्याची स्टाईल, एखाद्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याची सवय यातही साम्य येऊ लागतं. सुरुवातीला वेगवेगळ्या आवडी असल्या तरी हळूहळू आवडीनिवडी बदलतात. कोणाला कोणता पदार्थ आवडतो, कुठे फिरायला जायचं, कसं राहायचं ही सगळी मतं एकसारखी होत जातात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची दिनचर्या. झोपण्याच्या वेळा, उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, कामाची पद्धत, टीव्ही पाहण्याच्या सवयी, सगळं काही हळूहळू सारखं होत जातं. वर्षानुवर्षे एकमेकांच्या सोबत आयुष्य घालवल्यावर हे बदल अगदी नैसर्गिकरीत्या होत जातात. खरं तर हा बदल प्रेमाचा, साथसंगतीचा आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाचा आरसा असतो. म्हणूनच अनेक वर्षांनंतर जोडपी फक्त मनाने नाही तर दिसायलाही एकमेकांसारखी वाटू लागतात.

Comments are closed.