हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरणे कितपत सुरक्षित? केसांचं होऊ शकतं नुकसान
हिवाळ्यात त्वचेसह केसांच्या समस्या वाढतात. त्यातच केस धुतल्यानंतर ओले केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरले जाते. हा केस त्वरित कोरडे करून स्टाईलिश दिसण्यासाठी खूप सोयीस्कर उपाय आहे. पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात हेअर ड्रायर वापरणे सुरक्षित नसते. यामुळे केसांचं जास्त प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे शक्यतो हिवाळ्याच्या दिवसांत हेअर ड्रायर वापरणे टाळावं. ( Side Effects of Hair dryer in winter )
हिवाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश नसतो. त्यामुळे बहुतांश वेळा सकाळच्या घाईमध्ये केस धुतल्यावर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरला जातं. मात्र जेव्हा तुम्ही घाईघाईने केस वाळवतात तेव्हा हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा तुमच्या केसांचा नैसर्गिक ओलावा नष्ट करते. यामुळे केसांतील कोरडेपणा वाढतो.
ज्या महिला नियमितपणे हेअर ड्रायर वापरतात त्यांच्या केसांना अधिक नुकसान होऊ शकते. उष्णतेमुळे केसांच्या क्यूटिकल्सवर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे ते निस्तेज आणि कोरडे होतात.
हेअर ड्रायरमुळे टाळूवर देखील गंभीर परिणाम होतात. यामुळे टाळूला जळजळ आणि खाज येऊ शकते. यामुळे केस गळतीही वाढू शकते.
हेअर ड्रायरमुळे केसांची मुळे कमकुवत होतात. यामुळे केस ठिसूळ, कोरडे आणि निस्तेज दिसतात, ज्यामुळे केस गळतीची समस्याही होते.
त्यामुळे हिवाळ्यात हेअर ड्रायर नेहमी कमी हिटवर वापरावे. यासोबतच हेअर स्प्रे किंवा सीरमचाही वापर करा जेणेकरून केसांचा नैसर्गिक ओलावा कायम राहील. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही हानी शिवाय हेअर ड्रायरचा फायदा होऊ शकतो.
Comments are closed.