Kitchen Tips : साध्या जेवणाची चव दुप्पटीनं वाढवणाऱ्या किचन टिप्स
बऱ्याच महिलांना स्वयंपाक करणे ही अवघड गोष्ट वाटते. त्यांना सतत आपल्यालाकडून काही चुकेल का? पदार्थात मीठ जास्त होईल का? पदार्थ कच्चा राहील का? असे प्रश्न सतावतात. पण, महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी स्वयंपाक करणे कठीण गोष्ट नाही. तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्यास चवदार पदार्थ नक्कीच बनवू शकता. जाणून घेऊयात प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरतील अशा किचन टिप्स,
- कडधान्यात वर्तमानपत्रांचे तुकडे घातल्याने शाईमुळे कडधान्याला किडे लागत नाही.
- शिळ्या भातावर बर्फाचा तुकडा ठेवून 2 ते 3 मिनिटे मायक्रोवेव्ह करा. यामुळे भाताला छान चव येते.
- बटाटे उकडण्यापूर्वी काटा चमच्याने होल पाडावा. या ट्रिकमुळे बटाटे चटकन शिजतात.
- पनीर ब्लोटिंग पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्यास जास्त दिवस फ्रेश राहतो.
हेही वाचा – Gardening Tips: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे कोमेजतात झाडं; अशी घ्या काळजी
- दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना त्यात थोडी दुधावरची साय टाकल्यास चव वाढते.
- कोणतीही पालेभाजी सुकल्यासारखी झाल्यास थंड पाण्यात लिंबाचा रस टाकून त्यात 1 तास बुडवून ठेवावी. यामुळे पुन्हा हिरवीगार दिसते.
- कचोरी, सामोसा, भटुरे बनवण्यासाठी मैद्यात थोडं दही टाकून पीठ मळा. यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो.
- पोहे धुताना एकमेकांना चिकटतात. हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे मोकळे राहतात.
- भाजीत दही घातल्यास ते फाटते, अशा वेळी त्यात एक चमचा बेसन मिसळून टाका यामुळे दही फाटत नाही.
- लसून पटकन सोलण्यासाठी मिनिटभर ओव्हनमध्ये गरम करावेत. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून जोरात हलवा.
- आल्याची पेस्ट साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचे तेल मिक्स करावे.
- कधी कधी टोमॅटोमुळे भाज्या जास्त आंबट होतात. अशा स्थितीत भाजीत थोडी साखर घालावी, आंबटपणा संतुलित होतो.
- पदार्थात लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून घालावा. यामुळे लसणाचा चांगला स्वाद येतो.
- भात शिजवताना त्यात थोडे तूप किंवा लिंबाचे थेंब घातल्याने भात मोकळा होतो.
हेही वाचा – फेड सेफ्टी टिप्स: 'या' भाजीपाला हॉट क्राफ्ट आहे तर हॉस्पिटलला तोंड द्यावे लागते
Comments are closed.