Bride Jewellery Shopping: लग्नासाठी नववधुची ज्वेलरी घेताय? मग ‘या’ चुका टाळा; अन्यथा बिघडेल लूक
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतो. या दिवसासाठी भरपूर तयारी केली जाते. कारण या दिवशी आपण सर्वांपेक्षा सुंदर दिसावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. मग अगदी साडी, आऊटफिट, मेकअप, हेअरस्टाईल, मेहेंदी ते ज्वेलरीपर्यंत सर्व काही खूप विचारपूर्वक निवडले जाते. कारण एखादी गोष्टी चुकीची निवडली तर संपूर्ण लूक बिघडू शकतो. ( Avoid these mistakes while Bride’s Jewellery Shopping )
अनेकदा चुकीच्या दागिन्यांमुळेही नवरीचा लूक शोभून दिसत नाही. लग्नाचे दागिने घेताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या मिनिमलिस्ट आणि कस्टमाइज्ड सेट हे जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळे हेव्ही दागिने घेणं टाळावं. लग्नाचे दागिने निवडताना काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया…
बऱ्याचदा मुलींना एखाद्या दागिन्यांचं डिझाईन आकर्षक वाटलं की ते घेऊन टाकतात. पण तसं करणं टाळा. कारण तुमच्या आऊटफिट आणि चेहऱ्यानुसार दागिने घेणं ही सर्वात पहिली प्राथमिकता असली पाहिजे. कारण कोणत्याही डिझाईनचे दागिने हे प्रत्येकाला सूट होतीलच असं नाही.
लग्नाचे दागिने घेताना सर्वात आधी तुमचं आऊटफिट फायनल झालेलं असावं. त्यापूर्वी दागिने घेऊ नये. तुमच्या आऊटफिटचा रंग, डिझाईन आणि नेकलाइन या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मग त्यावरील ज्वेलरी निश्चित करावी. नाही तर तुमचा लूक बिघडण्याची शक्यता जास्त असते.
बऱ्याचदा चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असतो म्हणजेच काहींचा चेहरा हा गोल असतो, तर काहींचा उभा असतो. हे देखील दागिने घेताना लक्षात घ्यायला हवं. कारण चुकीच्या दागिन्यांमुळे चेहरा विचित्र दिसतो. त्यामुळे हे दागिने घेताना शक्यतो ट्राय करून पहा. तुमच्या चेहऱ्याला ते सूट होत असतील तरच ते घ्यावे.
जास्त हेवी दागिने घालण्याचा ट्रेंड आता नाही. त्यामुळे जड नेकपीस, कानातले, हेडबँड, नथ हे एकाच वेळी घातल्यास चांगलं दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक लूकसाठी दागिने निवडताना ही बाब लक्षात घ्यायला हवी. कारण या दिवशी भरपूर हालचाल असते. अनेक गोष्टी करायच्या असतात, त्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल असणं सर्वात जास्त गरजेचं आहे.
बऱ्याचदा स्वस्त दागिन्यांमध्ये कारागिरी आणि टिकाऊपणाचा अभाव असतो. त्यामुळे लग्नासाठी दागिने घेताना ब्रँडिंग आणि हॉलमार्क आवश्यक आहेत. तसेच टिकाऊ आणि चांगल्या दर्जाचे दागिने घ्यावे. जेणेकरून ते पुढेही सणावाराला घालता येतात.
हेही वाचा: लग्नाच्या दिवशी नवरीच्या पर्समध्ये ‘या’ गोष्टी हव्याच, एकदा लिस्ट वाचा !
Comments are closed.