Haircare Tips: केसांमध्ये उवा झाल्यास काय करावं? तज्ञांनी सांगितले प्रभावी घरगुती उपाय

अनेकदा केसांमध्ये उवा होतात. यामुळे खाज, जळजळ या समस्या होतात. यामुळे टाळूला हानी पोहोचू शकते. त्यामुळं वेळीच त्यावर उपाय करणं गरजेचं असतं. केसांतील उवा कमी करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध असतात. पण कधीकधी त्याचा परिणाम दिसून येत नाही. किंवा उवा कमी होण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही घरगुती, नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरतात. यामुळं केसांमधील उवा निघून जातातच शिवाय तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतात. ( Homemade Natural Remedies To Remove Lice In Hairs )

कडुलिंबाचं पाणी
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीपॅरासायटिक गुणधर्म असतात, ज्यामुळं उवा काढण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याने केस धुवा. कडुलिंब केसांमधून उवा काढून टाकण्यास मदत करते आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरतं.

लसूण आणि लिंबाचा हेअरपॅक
लसूण उवा कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी काही लसूण पाकळ्या ठेचून घ्या त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट टाळूला लावा आणि ३० मिनिटांनी तुमचे केस स्वच्छ धुवा. लसणात नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म आहेत जे उवा काढून टाकण्यास मदत करतात.

कंडिशनिंग आणि कोम्बिंग
उवा काढण्यासाठी कंडिशनिंग आणि कोम्बिंग हा उपाय देखील प्रभावी ठरतो. त्यासाठी प्रथम तुमचे केस ओले करा आणि कंडिशनर लावा. नंतर एक बारीक दात असलेल्या कंगव्याने टाळूपासून टोकापर्यंत केस विंचरून घ्या. यामुळे तुमच्या केसांमधून उवा निघून जातात.

हे महत्त्वाचं:

  • केसांत उवा टाळण्यासाठी, तुमचे केस आणि टाळू नियमितपणे शाम्पू आणि कंडिशनरने धुवा.
  • तुम्हाला आवश्यक असलेले वक्र वापरणारे तुम्ही, शेअर केलेले नकाशे आहात.
  • तसेच तुमचा कंगवा, उशी, चादरी नियमितपणे स्वच्छ कराव्यात.

Comments are closed.