Paush Month: कधी सुरु होतोय पौष महिना? वाचा काय करावं आणि काय टाळावं
हिंदू कॅलेंडनुसार मार्गशीर्षनंतर पौष महिना येतो. हा हिंदू वर्षाचा 10 वा महिना असून धार्मिक दृष्टीकोनातून पौष महिन्याला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात सूर्य धनू राशीत प्रवेश करतो, ज्याला ‘धनु संक्राती’ असे म्हणतात. हा जो काळ असतो त्याला’ खरमास’ असे देखील म्हणतात. सूर्य देवाची पूजा करण्यासाठी, पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी विशेष मानला जातो. हा महिना शुभ फळे देणारा असतो. त्यामुळे या महिन्यात काही कामे निषिद्ध मानली जातात. आज आपण जाणून घेऊयात 2025 मध्ये पौष महिना कधी सुरू होतोय आणि या महिन्याचे नियम काय आहेत.
कधी सुरु होतोय?
हिंदू पंचागानुसार पौष महिना शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी सुरू होत आहे. पौष पौर्णिमा 3 जानेवारी 2025 रोजी आहे . त्यामुळे पौष महिना शनिवार 3 जानेवारीपर्यंत असेल. तर मराठी कॅलेंडरनुसार पौष महिना 21 डिसेंबर 2025 रोजी सुरू होऊन 18 जानेवारी 2025 रोजी संपेल.
हेही वाचा – Datta Jayanti 2025 : यंदा दत्त जयंतीचा सोहळा होणार गुरुवारी, जाणून घ्या तारीख
हे महत्त्वाचे –
- पौष महिन्यात लग्न, मुंडन, घर घेणे, नवीन व्यवसाय सुरु करणे अशी कामे निषिद्ध मानली जातात.
- खरमासात शुभ कामांचे चांगले फळ मिळत नाही असे सांगितले जाते.
- पौष महिन्यात तीळ दान करणे शुभ मानले जाते.
- शरीराची तेलाने मालिश करणे चांगले फळ देऊ शकते.
- पौष महिन्यात अन्नदान तुम्ही करू शकता.
- थंड पदार्थ खाणे पौष महिन्यात टाळायला हवे.
- या महिन्यात दररोज न चुकता सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. सूर्याला अर्घ्य देणे फलदायी असते.
- आहारात या महिन्यात गूळ, आले, लसूण आणि तीळ यांचा समावेश करावा.
हेही वाचा – Tulsi Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ ठेवा ‘या’ वस्तू; आर्थिक अडचणी होतात दूर
Comments are closed.