Beer Fact : बिअर पिल्यावर पोट का वाढतं? ‘या’ चुकांमुळे बिअर बनते वजनवाढीचं मोठं कारण
बिअर हे जगभरात सर्वाधिक पिण्यात येणाऱ्या पेयांपैकी एक आहे. मित्रांसोबतच्या गप्पा, पार्टी, ट्रिप किंवा विकेंड… अनेक जण बिअरशिवाय हे क्षण अपूर्ण समजतात. पण या मजेत एक मोठा धोका लपलेला असतो वजन वाढणे आणि पोट पुढे येणे. अनेकांना वाटतं की “बिअरमुळेच पोट वाढतं”, पण प्रत्यक्षात बिअरसोबत आपण करत असलेल्या काही चुका वजनवाढीचं मुख्य कारण ठरतात. (beer weight gain why beer increases belly fat common mistakes)
बिअरमध्ये कॅलरीज असतात पण पोषण नाही
बिअरमध्ये अल्कोहोल, कार्बोहायड्रेट्स आणि काही प्रथिने असतात. मात्र या कॅलरीजला रिकाम्या कॅलरीज म्हणतात, कारण त्यातून शरीराला पोषण मिळत नाही. ऊर्जा मिळते पण शरीरावर चरबी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू ही चरबी पोटाच्या भागात साठते आणि यालाच सामान्य भाषेत “बिअर बेली” म्हटलं जातं.
बिअर प्यायल्यानंतर शरीरात काय होतं?
शरीर अल्कोहोलला नेहमी विषासारखे मानते. म्हणून पिण्यानंतर शरीर पहिल्यांदा अल्कोहोलचं विघटन करण्यामध्ये व्यस्त होतं. त्यामुळे त्या दरम्यान तुमच्या खाण्यातील कार्ब्स आणि फॅट जळत नाहीत. त्याऐवजी ते थेट चरबीच्या रूपात साठवले जातात. यामुळे वजन वाढण्याची गती अधिक होते.
बिअर भूक वाढवते
बिअर किंवा कोणतेही अल्कोहोल मेंदूतील भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर परिणाम करते. त्यामुळे भूक वाढते, क्रेव्हिंग वाढते आणि ब्रेनचा कंट्रोल कमी होतो. त्यामुळेच बिअर प्यायल्यानंतर आपण चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर असे ‘कमी पोषण, जास्त कॅलरी’ असलेले पदार्थ खातो. आणि यामुळे हे पदार्थ + बिअर = वजनवाढीचं जबरदस्त कॉम्बिनेशन बनतं.
बिअरसोबत सर्वात धोकादायक पदार्थ
बिअर पिताना किंवा त्यानंतर हे पदार्थ वजन वाढवण्यासाठी सर्वात जास्त कारणीभूत ठरतात:
तळलेले/तेलकट पदार्थ: फ्रेंच फ्राईज, चिप्स, पकोडे, समोसा
कर्बोदके भरपूर असलेले फास्ट फूड: पिझ्झा, बर्गर, पास्ता
खारट स्नॅक्स: नमकीन, चकली, वेफर्स
गोड पदार्थ कारण बिअरमध्ये आधीच साखर असते, गोड खाल्लं की कॅलरी दुप्पट
हे सर्व पदार्थ रक्तातील साखर वाढवून चरबी साठवण्याची प्रक्रिया झपाट्याने वाढवतात.
बिअर पित असाल तर काय खावे? (सुरक्षित पर्याय)
प्रथिनेयुक्त स्नॅक्स: भाजलेले चणे, पनीर टिक्का (कमी तेलात), ग्रील्ड चिकनचे तुकडे
हलकं आणि पचायला सोपं अन्न: काकडी, गाजर, सॅलड्स
भरपूर पाणी बिअरनंतर निर्जलीकरण वाढतं. पाणी प्यायल्याने चयापचय सुधारतं.
बिअरमुळे कॅलरीज वाढतातच पण बिअरसोबत चुकीचं खाणं केल्याने वजन तीनपट जलद वाढतं. जर बिअर एंजॉय करायची असेल तर अन्नाची योग्य निवड आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर बिअर ही मजा न राहता वजनवाढीचं माध्यम बनते.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. My Mahanagar.Com आणि Only मानिनी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Comments are closed.