Winter Joint Pain : थंडीत वारंवार चहा-कॉफी प्यायल्याने वाढते गुडघेदुखी?

हिवाळ्यातील गुलाबी थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी जास्त चहा-कॉफीचे सेवन केले जाते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की जास्त प्रमाणात चहा-कॉफी प्यायल्याने हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जास्त कॉफी-चहा प्यायल्याने शरीरात कॅफिन आणि साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीर डिहायड्रेट होते. एम्स रायपूर येथील ऑर्थोपेडिक ऍंड स्पोर्ट्स इंजरी सर्जन डॉक्टरांनी अलीकडेच सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे जास्त चहा आणि कॉफी पिणं का टाळावं हे सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गरम चहा-कॉफी हाडांना कशी त्रासदायक ठरू शकते जाणून घेऊयात सविस्तरपणे.

थंडीचे दिवस सुरू होताच शरीराला उबदार ठेवण्यासाठी चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण वाढते. यासोबत पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे डिहाड्रेशन होतं. डिहाड्रेशन झाल्याने कार्टिलेज अर्थात दोन हाडांमधील उशी म्हणून काम करणारा मऊ थर सुकतो. यामुळे साध्यांतील कडकपणा वाढतो आणि हाडांमधील घर्षणामुळे वेदना वाढू लागतात.

या पोस्टद्वारे डॉ. सांगतात की या दिवसात अवश्य चहा-कॉफी प्यावी, पण त्यापूर्वी पाणी पिण्याची सवय लावावी. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि गुडघेदुखी होणार नाही.

हेही वाचा – Menstrual Flow Amount: मासिक पाळीदरम्यान किती रक्तस्त्राव नॉर्मल? महिलांनी नक्की काय जाणून घ्यायला हवं

Comments are closed.