कोणत्याही पूजेत तांदळाला इतकं महत्त्व का?

कोणतीही पूजा करताना हळद-कुंकूसह अक्षता अर्थात तांदळाचा वापर करण्यात येतो. देवाला हळद-कुंकू लावल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. इतकंच काय तर लग्नात शुभमंगल सावधान म्हणत नवरा-नवरीवर अक्षता टाकल्या जातात. नवरीची ओटी भरायची असेल किंवा गृहप्रवेशावेळी मापट्यात तांदूळ ठेवलेले असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की प्रत्येक पूजेत तांदूळच का? इतर धान्ये गहू, नाचणी, बाजरी का नाही. चला जाणून घेऊयात कोणत्याही पूजेत तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे.

ज्या तांदूळाची पूजा केली जाते तेच का?

  • अक्षय धन म्हणजे तांदूळ. याचा अर्थ असा की खराब न होणारं, टिकाऊ. तांदूळ पांढरे शुभ्र असल्याने ते शुद्धता आणि शांततेचं प्रतीक मानले जातात.

  • तांदळाचा दाणा अखंडतेचे आणि विकासासाचे प्रतीक आहे कारण एका दाण्यातून अनेक तांदळाच्या दाण्यांची निर्मिती होते.
  • तांदळामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं.

  • असं म्हणतात की औक्षण केल्यावर कपाळाला तांदूळ चिकटले की व्यक्तीसाठी शुभ फळ देतं.
  • कोणत्याही शुभकार्यात तांदूळ वापरण्याचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनात भरभराट, सुख समृद्ध आणि अखंड आनंद येणे.

एकदरंच, या सर्व कारणांमुळे भारतीय संस्कृतीत तांदळाशिवाय कोणतंही शुभकार्य पूर्ण होत नाही, असे सांगितलं जातं.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.)

हेही वाचा – Paush Month: कधी सुरु होतोय पौष महिना? वाचा काय करावं आणि काय टाळावं

Comments are closed.