टच डब्ल्यूओडी : जेव्हा तुम्ही चांगले वाक्यांश म्हणता तेव्हा तुम्ही तावडे म्हणता?
‘टच वूड’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो किंवा वापरतो. कोणतेही चांगले वाक्य बोलताना हे वाक्य सहजपणे आपण बोललं जातं. इतकंच काय वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी कित्येकदा ‘टच वूड’ असं म्हटलं जातं. कारण असं बोलल्याने चांगल्या कामांना नजर लागत नाही असं मानलं जातं. पण, यामागचं खरं कारण कोणतं आहे? चांगले वाक्य बोलताना टच वूड का म्हणतात? चला जाणून घेऊयात.
प्राचीन पॅगन संस्कृतीतील लोकांचा असा विश्वास होता की झाडांमध्ये देवता आणि आत्मे वास करतात. त्या काळी लोक झाडांना पवित्र मानत असतं. लाकडाला हात लावल्याने नकारात्मक शक्ती दूर जाते, अशी श्रद्धा त्याकाळी होती. त्यामुळे झाड किंवा लाकडाला स्पर्श करणं शुभ मानलं जातं. यातूनच ‘टच वूड’ म्हणण्याची प्रथा सुरू झाली असं म्हणतात.
हेही वाचा – Secrets of Long Life: …म्हणून १०० वर्षे जगतात माणसं; हे आहे गुपित !
युरोप, आशिया, मध्य-पूर्व आणि दक्षिण अमेरिकत वेगवेगळ्या प्रकारे ‘टच वूड’ म्हटलं जातं. आता तर ही एक आंतरराष्ट्रीय मानसिक संकल्पना बनली आहे. याशिवाय असंही म्हटलं जातं की, ‘टच वूड’ म्हणणं स्वत:ला दिलेला भरोस आणि शुभेच्छा असतात. दुसऱ्याच्या यशावर न जळता, वाईट नजर न टाळण्याची शुभेच्छा असतात.
तुर्की –
तुर्कीमध्ये लोक लाकडावर तीन वेळा टकटक करतात. असं केल्याने दुर्भाग्य दूर जातं आणि नशीब उजळतं असं म्हणतात.
ग्रीस आणि इराण –
ग्रीस आणि इराणमध्येही ही गोष्ट केली जाते. नकारात्मक गोष्टींना थांबवण्यासाठी लोक लाकडाला स्पर्श करतात.
विज्ञान काय सांगतं?
टच वूड करणं ही मानसिक सकारात्मकतेसाठी फायदेशीर कृती आहे. यामुळे मनात आत्मविश्वास निर्माण होतो.
हेही वाचा – Bride And Wedding: लग्नाचा अजब नियम, येथे केवळ स्थूल नवरीलाच मागणी
Comments are closed.