Balcony Decor Ideas: घरातील बाल्कनी सजवण्यासाठी युनिक आणि बजेट फ्रेंडली टिप्स
घरातील बाल्कनी असं ठिकाण आहे, जिथे तुम्ही दिवसभराच्या धकाधकीनंतर शांत बसून काही क्षण घालवू शकता. यामुळे मूड एकदम फ्रेश होतो आणि थकवा कमी होतो. अनेक जण संद्याकाळी बाल्कनीत बसून वाचन करणं, गाणी ऐकणं, कोफी पिणं पसंत करतात. त्यामुळं जर बाल्कनी सुंदर सजवलेली असे तर मन अधिकच प्रसन्न होतं. त्यामुळेच कमी बजेटमध्ये बाल्कनी सजवण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.. ( Budget Friendly Ideas and Tips to decorate balcony )
हँगिंग रोपे
बाल्कनीमध्ये हँगिंग रोपे सुंदर दिसतात. तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हँगिंग रोपे लावावीत. यामुळे बाल्कनी अधिक शोभून दिसते. हँगिंग रोपांमध्ये तुम्ही रंगीबेरंगी रोपे लावल्यास सजावटीत आणखी भर पडते.
सोफा सेट
तुमची बाल्कनी आकर्षक दिसण्यासाठी, तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये छोटा सोफा सेट देखील ठेवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोफा सेट रंगीबेरंगी कुशनने देखील सजवू शकता.
झोका
अनेक जणांच्या घरी झोका असतो. त्यामुळं तो बाल्कनीत ठेवावा. यामुळं रिकाम्या वेळेत झोक्यावर बसून रिलॅक्स होता येतं.
पक्षीगृह
तुमच्या बाल्कनीला सुंदर बनवण्यासाठी तुम्ही एका कोपऱ्यात बर्डहाऊस ठेवू शकता. यामुळं पक्षी काही वेळ त्यात राहतात. जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर तुम्ही नक्कीच बर्डहाऊस बाल्कनीत ठेवावे.
आर्टिफिशियल गवत
बाल्कनीत आर्टिफिशियल गवत टाकल्याने अधिक चांगलं दिसते. यामुळं फरशीवर घाण साचत नाही. तसेच फ्रेश वाटते.
फोल्डिंग टेबल आणि खुर्ची
जर तुमची बाल्कनी मोठी असेल, तर तुम्ही आरामदायी फोल्डिंग फर्निचर, जसे की लहान टेबल आणि खुर्च्या ठेवू शकता. तुम्ही त्यावर कुशन देखील ठेवू शकता.
Comments are closed.