Health Tips: नातेसंबंधात लग्न म्हणजे ‘या’ अनुवंशिक आजाराचा धोका

प्रत्येक पालकाला आपले मूल पूर्णपणे निरोगी असावे असे वाटते. पण जर बाळाच्या जन्मानंतरच त्याला एखादा गंभीर आजार असल्याचं आढळलं तर पालकांना मोठा धक्का बसतो. यापैकी बहुतांश आजार हे अनुवंशिक असू शकतात. खरं तर, आपल्याकडे नात्यात लग्न करण्याची प्रथा फार जुनी आहे. पण असं म्हणतात की नात्यात लग्न केल्याने मुलांना अनुवंशिक आजाराचा धोका वाढतो. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे जाणून घेऊया..

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. इम्रान पटेल यांनी अलीकडेच एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की, नात्यात लग्न झालेल्या जोडप्यांच्या मुलांना अनुवांशिक आणि गंभीर आजारांचा धोका असतो. या व्हिडिओमध्ये तज्ञ म्हणतात, ‘मी आज ज्या विषयावर चर्चा करणार आहे त्या विषयावर काही लोक सहमत असतील आणि काहीजण सहमत नसतील. पण माझा हेतू वाद निर्माण करण्याचा नाही, तर अचूक माहिती प्रदान करण्याचा आहे. मी धार्मिक विद्वान नाही किंवा कोणत्याही समुदायाचा प्रतिनिधी नाही, परंतु एक डॉक्टर म्हणून, जे वाचले आणि पाहिले ते तुमच्यासोबत शेअर करणे माझे कर्तव्य आहे. म्हणून, मी स्पष्ट सांगतो नातेसंबंधात लग्न करणे पूर्णपणे टाळा.

तज्ञांच्या मते, ‘जेव्हा लग्न नातेसंबंधात असते तेव्हा आई किंवा वडिलांच्या बाजूने असलेले किरकोळ अनुवांशिक रोग मुलामध्ये संक्रमित होऊ शकतात आणि पुढे गंभीर ठरू शकतात. नातेसंबंधात विवाह केल्याने मुलांमध्ये मेटाबॉलिक, अनुवांशिक आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हजारो वर्षांच्या संशोधनातून, वैद्यकीय पुस्तकांमधून आणि अभ्यासातूनही हे सिद्ध झालं आहे’.

अनुवांशिक रोग काय आहेत?
ClevelandClinic.org नुसार, नातेसंबंधात लग्न झाल्याने जोडप्यांच्या मुलांना डाउन सिंड्रोम, फ्रेजिल एक्स सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम आणि ट्रिपल-एक्स सिंड्रोम सारख्या गंभीर आजारांचा धोका असू शकतो.

Comments are closed.