सावधान ! नेलपॉलिशमुळे नखं होतात डॅमेज
स्टायलिश दिसण्यासाठी टापटीप राहणं महत्वाचे आहे. यात फक्त कपडेच महत्वाचे नसतातं तर तुमचा सगळा लूकच महत्वाचा असतो. यामुळे महिला हात सुंदर दिसण्यासाठी नखांना नेलपॉलिश लावतात. विविध रंगाच्या शेड्समुळे नखं सुंदर आणि आकर्षक दिसतात. पण जर ही नेलपॉलिश तुम्ही नखांवर जास्त दिवस ठेवली तर मात्र तुमची नखं कायमची डॅमेज म्हणजेच खराब होऊ शकतात.
नखं पिवळी पडतात
नखांवर नेलपॉलिश जास्त दिवस राहील्यास नखांची नैसर्गिक चमक कमी होते. नखं पिवळी पडतात.
कोरडेपणा
नखांवर नेलपॉलिश लावल्याने नखांना आवश्यक ऑक्सीजन मिळत नाही. तसेच नखांवर नेलपॉलिश जास्त दिवस ठेवल्याने नख कोरडी होतात व तुटतात.
अॅलर्जी
काही नेलपॉलिशमध्ये फॉर्मल्डिहाइड , टोल्यून यांसारख्या हानिकारक रासायनिक तत्वांचा वापर करण्यात आलेला असतो. नखांवर जास्त दिवस नेलपॉलिश ठेवल्यास या रसायनांचा त्वचेवरही परिणाम होतो. त्यामुळे अनेकांना अॅलर्जी, खाज किंवा पुरळ सारख्या समस्यांचा त्रास होतो.
बुरशीजन्य संसर्ग
नखांवरील नेलपॉलिशचा मोठा थर नखांना कव्हर करतो. त्यामुळे नखांमध्ये ओलसरपणा तसाच राहतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा शक्यता वाढते.
किती दिवसांनी नेलपॉलिश काढावी
तज्ज्ञांनुसार नखांवर कोणतीही नेलपॉलिश ५ ते ७ दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. आठवड्याभरानंतर नखांवरून नेलपॉलिश काढावी. त्यामुळे नखांपर्यंत ऑक्सीजन पोहचण्यास मदत होते. त्यातील कोरडेपणा जातो. पण जर तुम्हाला नेलपॉलिश लावण्याची आवड असेल तर नेलपॉलिश अप्लाय आणि रिमूव्हल मध्ये २-३ दिवसांचे अंतर असावे.
नेलपॉलिश कशी काढाल?
नेलपॉलिश काढण्यासाठी एसीटोन, फ्री रिमूव्हर वापरावे.
प्रत्येकवेळी नखं काढल्यावर नखांवर आणि क्युटिकल्सवर मॉयस्चरायझर किंवा तेल लावावे.
नेलपॉलिश लावताना नखांवर सर्वात आधी बेस कोट लावावा. त्यामुळे नेलपॉलिशमधील रासायनिक घटकांचा त्यांवर परिणाम होत नाही.
Comments are closed.