Radium Toys: अंधारात रेडियम खेळणी नेमकी कशी चमकतात? मुलांच्या सुरक्षिततेसाठी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
लहानपणी भिंतींवर लावले जाणारे हिरवे चमकदार तारे आजही अनेकांच्या आठवणीत आहेत. लाईट बंद होताच खोली हलक्या हिरव्या प्रकाशाने उजळायची आणि वातावरणात जादू पसरल्यासारखे वाटायचे. आज बाजारात अशा असंख्य ग्लो इन द डार्क खेळण्यांचा, स्टिकर्सचा, कपड्यांचा आणि सजावटीच्या वस्तूंचा खूप ट्रेंड आहे. परंतु त्या चमकदार वस्तू जितक्या आकर्षक दिसतात, तितक्या सुरक्षित आहेत का? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (how glow in dark toys work and safety tips for kids)
त्या ड्रॉकमधला ग्लू कसा पचवायचा?
अंधारात चमकणाऱ्या बहुतेक खेळण्यात एक खास प्रकारचा पदार्थ वापरला जातो. प्रकाश पडल्यावर हे पदार्थ ऊर्जा साठवून ठेवतात आणि लाईट बंद झाल्यावर ती ऊर्जा हळूहळू प्रकाशाच्या रूपात सोडतात. यालाच फोटो ल्युमिनेसन्स म्हटलं जातं.
या खेळण्यांत मुख्यतः दोन प्रकारची सामग्री वापरली जाते
1.जिंक सल्फाइड – कॉपरसह प्रक्रिया केल्यावर हा पदार्थ कमी वेळ चमक देतो.
2.स्ट्रॉन्शियम अल्युमिनेट – यावर प्रकाश पडल्यावर हा पदार्थ अनेक तास चमक देऊ शकतो.
लाईट लागल्यावर या पदार्थांतील इलेक्ट्रॉन ऊर्जा घेतात आणि अवस्था बदलतात. अंधारात हे इलेक्ट्रॉन परत आपल्या मूळ अवस्थेत जाताना प्रकाश सोडतात आणि त्यामुळे अंधारात चमक दिसते.
चमक किती वेळ टिकते?
सर्व ग्लो इन द डार्क वस्तू एकसारख्या नसतात. जिंक सल्फाइड वापरलेले जुने क्लासिक स्टार साधारण 20 ते 30 मिनिटे चांगली चमक देतात. स्ट्रॉन्शियम अल्युमिनेट वापरलेली खेळणी आणि पेंट 8 ते 10 तास हलका प्रकाश देऊ शकतात. खूप अंधारात ही हलकी चमकसुद्धा डोळ्यांना अधिक स्पष्ट दिसते. थोडा प्रकाश असला तर ही चमक कमी वाटते.
अशा खेळण्यांचा मुलांसाठी वापर किती सुरक्षित?
ग्लो इन द डार्क खेळणी सामान्य वापरात सुरक्षित मानली जातात. खोली सजवणे, कपड्यांवर वापरणे, भिंतींवर स्टिकर्स लावणे यात धोका नसतो. तरीही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:
– लहान मुलांनी ही खेळणी तोंडात घालू नयेत, चावू नयेत.
– पावडरसारखी सामग्री मुलांच्या हातात देऊ नये.
– भिंतीवर पेंट केला असल्यास तो पूर्णपणे सुकण्यापर्यंत खोली हवेशीर ठेवावी.
-पेंट किंवा पावडर डोळ्यात किंवा तोंडात गेल्यास त्रास होऊ शकतो. साध्या संपर्कात हे पदार्थ धोकादायक नसतात, परंतु शरीराच्या आत गेले तर जोखीम वाढते.
अंधारात चमकणारी खेळणी मुलांना खूप आवडतात आणि खोलीचे सौंदर्यही वाढवतात. योग्य वापर केला तर ती सुरक्षितही असतात. केवळ लहान मुलांनी अशी खेळणी तोंडातून घेऊ नयेत किंवा पेंटशी खेळू नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. जबाबदारीने वापर केल्यास ही खेळणी मजा आणि सुरक्षितता दोन्ही देतात.
Comments are closed.