Legislative Assembly winter Session : अजितदादांची चहापानाला दांडी अन् त्यांचे मंत्री दुसऱ्या रांगेत
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 08 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याविनाच कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन 2025 च्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्व सहयोगी मंत्री आणि आमदारांनी चहापान घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांचे मंत्री दुसऱ्या रांगेत म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर उभे असल्याचे पाहायला मिळाले.
Comments are closed.