Banana Leaf Benefits: केळीच्या पानावर जेवण केल्यास काय होते? फायदे जाणून स्टीलच्या ताटात खाणं सोडाल
आजकाल घरात स्टील, प्लास्टिक किंवा सिरॅमिकच्या ताटात जेवण वाढलं जातं. पण फार पूर्वीपासून आपल्याकडे केळीच्या पानात जेवणाची प्रथा आहे. आजकाल केळीच्या पानात जेवण करणं दुर्मिळ बनलं आहे. पण आजही दक्षिण भारतात, केळीच्या पानांवर जेवण वाढलं जातं. तसेच काही रेस्टॉरंट्समध्येही केळीच्या पानात डिश सर्व्ह करतात. केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. तुम्ही ते फायदे जाणून घेतले तर स्टील आणि प्लास्टिकच्या ताटात जेवणं सोडाल..
पौष्टिक मूल्य
केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल आणि जीवनसत्त्वे अ आणि क सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळं त्यावर गरम अन्न वाढलं की हे घटक अन्नात मिसळतात त्यामुळं आरोग्याला फायदा होतो.
पचनक्रिया सुधारते
केळीच्या पानांवर जेवल्याने पचनक्रिया सुधारते. कारण त्यात नैसर्गिक एंजाइम आणि फायबर असतात. हे अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या कमी करण्यास फायदेशीर असतं.
हेही वाचा: Health Tips: नातेसंबंधात लग्न म्हणजे ‘या’ अनुवंशिक आजाराचा धोका
बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म
केळीच्या पानांमध्ये असे गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात. म्हणून, त्यावर जेवल्याने अन्नजन्य आजाराचा धोका कमी होतो. पानांच्या पृष्ठभागावर असलेले घटक बॅक्टेरिया वाढीस रोखतात, ज्यामुळे अन्न सुरक्षित राहते.
रोगप्रतिकारकशक्ती
केळीच्या पानांमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे घटक शरीराचे संसर्गापासून संरक्षण करतात. केळीच्या पानांचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असल्याने अन्नातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
रसायन मुक्त
प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यांच्या तुलनेत केळीची पाने पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि त्यात कोणतेही हानिकारक रसायने नसतात. केळीच्या पानांवर जेवण केल्याने प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या बीपीएसारख्या हानिकारक रसायनांचा धोका कमी होतो.
टीप – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Comments are closed.