New Year Trip: न्यू इयर ट्रिप प्लॅन करताय? ‘ही’ ठिकाणं ठरतात परफेक्ट; जल्लोषात होईल नव्या वर्षाचं स्वागत

बहुतांश जण आता न्यू इयरचं स्वागत करण्यासाठी काही खास योजना बनवत असतील. अशातच जर तुम्ही न्यू इयर ट्रिप प्लॅन करत असाल तर देशातील काही ठिकाणं त्यासाठी परफेक्ट ठरतात. या ठिकाणी तुम्ही अगदी जल्लोषात, प्रवासाचा आनंद घेत नव्या वर्षाचं स्वागत करू शकता. चला तर मग त्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.. ( Perfect Destinations in India For New Year Trip )

ही अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुमच्या नव्या वर्षाची सुरूवात खरोखरच खास आणि अविस्मरणीय होईल. अगदी हिमालयाच्या बर्फाळ दऱ्यांपासून ते समुद्राच्या किनाऱ्यांपर्यंत ही ठिकाणे तुम्हाला एक अद्भुत अनुभव देतील.

मनाली
हिमाचलच्या थंड वातावरणात आणि बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये मनालीत नवीन वर्षाची सुरूवात करता येईल. कॅफे कल्चर, बोनफायर आणि लाईव्ह संगीतासह, तुम्हाला एक अनोखा अनुभव मिळेल. तसेच तुम्ही साहसी असाल तर इथे अनेक ऍडव्हेंचर्स ऍक्टिव्हिटीचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

गोवा
जर तुम्ही पार्टी लव्हार असाल, तर गोवा तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथील समुद्रकिनारे, क्लब आणि कॉटेजेसमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. तसेच लाईव्ह डीजे, आतषबाजी यामुळं नवीन वर्षाची सुरूवात करण्यासाठी गोव्याला सर्वाधिक पसंती असते.

उदयपूर
राजस्थानमध्ये प्रत्येक उत्सव खास बनतो. उदयपूरचे तलाव, राजवाडे आणि भव्य हॉटेल्स नवीन वर्षाला एक शाही अनुभव देतात. हे ठिकाण जोडप्यांसाठी आणि कुटुंब सहलींसाठी सर्वोत्तम ठरतं.

ऋषिकेश
जर तुम्हाला पार्टीपेक्षा शांतता आवडत असेल तर ऋषिकेश तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. गंगेच्या काठ, आरतीचे अध्यात्मिक वातावरण तुम्हाला नवीन वर्षाची सुरूवात करण्यासाठी सकारात्मक अनुभव मिळतो.

शिलाँग
ईशान्य भारतातील हे सुंदर शहर संगीत आणि निसर्ग प्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. शिलाँगचे लोकल म्युझिक बँड, थंड वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळं न्यू इयर सेलिब्रेशन आणखी खास बनतं.

Comments are closed.