Collagen Boosting Foods: अंडे ते लसूण; केसांच्या वाढीसाठी सुपरफूड्स ठरतात ‘हे’ पदार्थ

केसांच्या वाढीसाठी कोलेजन हा घटक अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यामुळंच केस निरोगी, दाट आणि चमकदार राहतात. केसांसाठी प्रथिने असलेलं केराटिन तयार करण्यासाठी कोलेजन हे मदत करते. तसेच ते केसांसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. ज्यामुळं केसगळती, केस पांढरे होणं, कोरडे केस, टाळूत जळजळ यांसारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते. कोलेजनमुळे टाळूतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते. त्यासाठीच काही पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने कोलेजन वाढण्यास, केसांच्या समस्या कमी होण्यास आणि केसांच्या वाढीस मदत होते. ( Collagen Boosting Foods For Hair Growth )

लसूण
लसूण त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यातील सल्फर शरीरात कोलेजनचे विघटन रोखतात. तुम्ही दैनंदिन आहारात भाजी, डाळीत लसूण घालून त्याचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमच्या जेवणाची चव तर वाढेलच पण शरीरात कोलेजन तयार होण्यासही मदत होईल.

चिकन
कोंबडीचे विंग्स आणि मांड्यांमध्ये अशा ऊती असतात, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या कोलेजन असते. अनेक कोलेजन पूरक पदार्थ देखील चिकनपासून बनवले जातात. चिकन शिजवून खाल्ल्याने शरीराला त्याच्या अमीनो आम्लांचा भरपूर पुरवठा होतो, ज्यामुळे टाळू निरोगी राहतो, केसांची मुळे मजबूत होतात.

हेही वाचा: Haircare Tips: केमिकलयुक्त उत्पादने टाळा; निरोगी केसांसाठी घरी करा हे आयुर्वेदिक उपाय

टोमॅटो
टोमॅटो हे लायकोपीनचा एक उत्तम स्रोत आहे, जो एक अँटिऑक्सिडेंट म्हणून ओळखला जातो. हा घटक त्वचेतील आणि केसांमधील कोलेजनचे सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून संरक्षण करतो. तुम्ही टोमॅटो कच्चे, शिजवलेले कोणत्याही स्वरूपात आहारात समाविष्ट केले तरी ते फायदेशीर ठरतात. दररोज ते खाल्ल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केसांची मुळे मजबूत होतात.

टीप- ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments are closed.