Nashik : हिवाळ्यात थंड पाणी टाळा; झोपण्याआधी गरम पाणी प्या : वैद्य विक्रांत जाधव

हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळावे. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिल्याने पचनास उपयोग होतो. हिवाळ्यात चिमुकल्यापासून वयोवृद्धांनी व गर्भवती महिलेने शरीराच्या गरजेनुसार जड आहार घ्यावा. तरुणाईने हिवाळ्यात व्यायाम करण्यासह जड आहार करावा, अशी माहिती वैद्य विक्रांत जाधव यांनी हिवाळ्यातील दिनचर्याबाबत दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.(Avoid cold water in winter,drink hot water before going to bed : Dr.vikrant jadhav)

डॉ. विक्रांत वैद्य म्हणाले की, सदृढ शरीरासाठी आहाराची गरज आहे. प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हिवाळ्यातील हवामान योग्य आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आहार वेगवेगळा असतो. हिवाळ्यामध्ये नाष्टा आणि दुपारच्या जेवणात अंतर असावे. दुपारच्या जेवणात सहा रसाचे अन्न अभिप्रेत आहे. त्यातून शरीराला आवश्यक असलेले सर्व धातू मिळतात. संध्याकाळी भूक लागल्यास पचायला हलके असलेले अन्न कमी प्रमाणात खावे. रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये दीड तासाचे अंतर असावे. झोपण्याआधी गरम पाणी प्यावे. त्यामुळे पचनास त्याचा उपयोग होते.
ऋतूनुसार व शरीराच्या आवश्यकतेनुसार आहार करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात तळलेले अन्न आहारात घेतल्याने शरीर उत्तम राहते. प्रत्येक व्यक्तीने आहार प्रकृतीनुसार घ्यावा. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला व्यायाम, आहार आणि शरीराचा समतोल साधता आला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही ऋतुमध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आहार आणि व्यायामात बदल करावा, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

अशा आहेत टिप्स

सॅलड खाल्ले तर जेवण कमी करावे. सॅलड ही पाश्चात्य देशातील संकल्पना आहे. कोशिंबीर ही भारतीय आहारात आहे. आहारात कांद्याच्या कोशिंबीर खावी. कांद्यात मिरी व सुंठ वापरावी. उन्हाळ्यात योगासने करण्यासह मैदानी व्यायामी कमी करावा. पावसाळ्यात योगासने व मैदानी खेळ खेळावेत. हिवाळ्यात भरपूर व्यायाम करावा. मैदानी खेळ खेळावेत. हिवाळ्यात उठबशा व सूर्यनमस्कार उत्तम व्यायाम आहे. हिवाळ्यात फळभाजी, कडधान्य, खोबऱ्याचा वापर करावा.

हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम आणि आहार घ्यावा. हिवाळ्यात मैदानी खेळ खेळावेत. हिवाळ्यात प्रतिकार शक्ती वाढणारे अन्नपदार्थ खावेत. पचनासाठी रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यावे.
-वैद्य विक्रांत जाधव

Comments are closed.