Employee Health: रिमोट वर्कचा साईड इफेक्ट, सततच्या स्क्रीन टाइममुळे वाढतोय डिजिटल बर्नआउट

डिजिटल युगात अनेक कंपन्या कर्मचारीांना घरून काम करण्याची संधी देतात. प्रवासात होणारा वेळ वाचणे, घराजवळ राहून काम करता येणे आणि फ्लेक्सिबल वेळ ही रिमोट वर्कचे मोठे फायदे आहेत. मात्र याचसोबत काही गंभीर तोटेही समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे डिजिटल बर्नआउट, म्हणजेच सतत ऑनलाईन राहण्यामुळे होणारा मानसिक आणि शारीरिक थकवा. (remote work digital burnout employee health tips)

आज मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लॅपटॉप, मोबाइल, ऑनलाईन मिटिंग्स आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे दिवसभर स्क्रीनसमोर राहतात. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये सीमारेषाच उरत नाही. त्यामुळे मानसिक ताण, झोपेच्या तक्रारी आणि चिडचिड वाढताना दिसते.

रिमोट वर्कमुळे कोणता बदल होतोय?

1. सतत ऑनलाईन राहण्याचं दडपण
ईमेल, मेसेजेस, मीटिंग्स यामुळे अनेकांना दिवसभरसक्रिय असल्याचं दाखवावं लागतं म्हणजेच ‘काम चालूच आहे’ अशी भावना तयार होते. मेंदूला विश्रांती मिळत नाही आणि ताण, चिंता, झोपेची समस्या वाढते.

2. घर आणि ऑफिसची जागा एकच होणे
घरातून काम करताना काम कधी सुरू होतं आणि कधी संपतं हेच कळत नाही. ब्रेक घेताना अपराधीपणाची भावना येते. परिणामी मानसिक थकवा वाढतो.

3. वाढता स्क्रीन टाइम आणि शारीरिक त्रास
मोबाइल, लॅपटॉप आणि सलग ऑनलाईन मिटिंग्समुळे डोळ्यांना ताण, डोकेदुखी, पाठीचा त्रास आणि एकाग्रता कमी होते. अनेकांना स्क्रीन फटीगची ((Screen Fatigue)) समस्या जाणवते.

4. सामाजिक संपर्क कमी होणे
ऑफिसमधील सहकाऱ्यांशी होणारा संवाद, टीमवर्क आणि हलक्या–फुलक्या गप्पा यामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे एकटेपणा आणि निराशा वाढते.

5. स्वतःला सिद्ध करण्यासाठी येणारे ओझं
घरून काम करताना अनेक जण अधिक काम करतात, कारण त्यांना नेहमी व्यस्त दिसण्याचा प्रयत्न करावा लागतो. यामुळे बर्नआउटचा धोका वाढतो.

डिजिटल बर्नआउट टाळण्यासाठी उपाय:

1. कामाचे नियम ठरवा
कामाचे ठरलेले तास संपल्यावर ईमेल्स, मेसेजेसला प्रतिसाद देऊ नका. मिटिंग्सचे वेळापत्रक ठरवा आणि त्याच पद्धतीने काम करा.

2. दर तासाला छोटा ब्रेक घ्या
स्क्रीन बंद करून काही मिनिटांचा विरंगुळा घ्या, चालून या किंवा हलका स्ट्रेच करा. हे एकाग्रता वाढवते आणि थकवा कमी करते.

3. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या
ताण जाणवत असेल तर जवळच्या व्यक्तीशी बोला. मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे.

4. काम–घर यांचा समतोल सांभाळा
कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि स्वतःसाठी वेळ काढा. स्वयंसंवर्धनाच्या सवयी लावा, छंद जोपासा.

5. कामाचे कौतुक करा आणि स्वीकारा
स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या कामाची दखल घेतल्याने मनोबल वाढते. आत्मविश्वास वाढतो आणि तणाव कमी होतो.

Comments are closed.