Winter Soup : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्या हे हेल्दी सूप

थंडीच्या दिवसात शरीराला विविध संसर्गाचा धोका असतो. या दिवसात आपण बहुतेकदा आजारी पडतो कारण आपल्या शरीरात आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजे नसतात. अशावेळी शरीर संसर्गापासून दूर राहावे यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही सूप प्यायला हवे.

सूप पिणे का आवश्यक ?

सूपाचा आहारात समावेश केल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहते. गरमागरम सूप प्यायल्याने सर्दीपासून बचाव होतो याशिवाय घरगुती सूप असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका शरीराला नसतो. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात फळे आणि भाज्या मिळतात. अशावेळी तुम्ही पालक आणि गाजर-बीटापासून तयार केलेला सूप पिऊ शकता.

पालक सूप

पालक सूप

पालकात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स A,C, K आणि लोह, फायबर असते. हे घटक शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. दररोज एक वाटी पालक सूप प्यायल्याने अशक्तपणा कमी होतो आणि वायरल इन्फेक्शनचा धोका निर्माण होत नाही. हे सूप पचनास मदत करते आणि पोटात उष्णता ठेवते.

गाजर बीटरूट सूप

गाजर बीट सूप
गाजर बीट सूप

गाजर आणि बीट दोन्ही ऍटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. गाजरात बीटा कॅरोटीन असते, जे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. यातील लोह आणि फोलेट रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतात. हे सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि वायरल इन्फेक्शन होत नाही.

टोमॅटो सूप (Tomato Soup)

थंडीच्या दिवसात शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटोचे सूप प्यायला हवे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात. याशिवाय हे सूप झटपट तयार होते.

(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – झोपेत असताना अचानक पडल्यासारखे का वाटते?

Comments are closed.