Password Habits : ब्रेकअप झाला… पण पासवर्ड अजूनही एक्सचा, पासवर्डमध्ये एक्सचं नाव का येतं ? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

आपण कितीही आधुनिक झालो तरी काही गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कायम बसून राहतात. त्यापैकी एक म्हणजे जुने रिलेशनशिप. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही अनेक लोक आपल्या मोबाईल, ई-मेल, सोशल अकाउंट्स किंवा लॅपटॉपचा पासवर्ड एक्सच्या नावावर ठेवतात. पासवर्ड म्हणजे पूर्णपणे खाजगी आणि सुरक्षित असलेली गोष्ट, पण तरीही त्यात एक्सचे नाव कसं आणि का येतं? हा फक्त सवयीतला भाग नाही, तर मनात दडलेलेल्या भावनांचा, आठवणींचा आणि अपूर्ण नात्यांचा संकेत असू शकतो. (why people use ex name as password psychology)

पासवर्डमध्ये एक्सचं नाव येण्याची कारणं
पासवर्ड बनवताना आपण बहुतेक वेळा विचार न करता पहिली आठवण वापरतो. अनेकांसाठी ही ‘पहिली आठवण’ म्हणजे त्यांच्या एक्सचं नाव असतं. त्याची तीन मोठी कारणं अशी

1. आठवण पटकन जागी होणं
रिलेशनशिपमध्ये एखादी व्यक्ती खूप जवळची असेल तर तिचं नाव मनात खोलवर बसतं. ब्रेकअपनंतरही ती मेमरी सहजपणे जागी होते. पासवर्ड बनवताना मन पहिला जो शब्द आठवतो तोच निवडतो.

2. अटॅचमेंट आणि नॉस्टॅल्जिया
एखादा जुना फोटो, जागा किंवा नाव पाहिलं की आपल्या मनात त्या नात्याचे क्षण पुन्हा जागे होतात. काही लोक जाणूनबुजून एक्सचं नाव पासवर्डमध्ये ठेवतात, जेणेकरून त्या आठवणी मनात जपून ठेवता याव्यात.

3. नातं संपलं… पण मन मात्र…
काहीवेळा एक्सच्या नावाचा पासवर्ड हा एक ‘हिडन कनेक्शन’ असतो. जणू स्वतःलाच सांगणे की हे नातं अजूनही कुठेतरी शिल्लक आहे. हा थोडासा कंट्रोल, थोडासा भावनिक बंध आणि कधी कधी पॅसिव-ॲग्रेसिव रिअॅक्शनही असतो.

मनाचे गुपित संकेत
– काही लोक एक्सला विसरण्यासाठी तयार नसतात, पण ते उघडपणे स्वीकारत नाहीत.
– काहीजणांच्या मनात इमोशन्स दडून राहतात आणि त्यातूनच एक्सचे नाव पासवर्डमध्ये राहतं.
– काहींसाठी पासवर्ड ही त्यांची ‘खास स्टोरी’ असते
– ⁠जिचं अस्तित्व फक्त त्यांनाच माहित असतं.

ही सवय धोकादायकही ठरू शकते
जुने नाते आठवून ठेवण्याचा हा भावनिक मार्ग असला तरी पासवर्डच्या दृष्टीने तो अतिशय कमजोर असतो. एक्सचे नाव, डेट किंवा क्रशचा उल्लेख सहज ओळखू येऊ शकतो आणि सुरक्षतितेचा धोका वाढतो.

काय करायला हवं?
भावना महत्त्वाच्या आहेत, पण सुरक्षा तितकीच महत्त्वाची. पासवर्डमध्ये खाजगी भावनांपेक्षा मजबूत कॉम्बिनेशन वापरणं नेहमी सुरक्षित असतं.

Comments are closed.