Winter Trending Sportswear: थंडीत वर्कआऊटसाठी ट्राय करा ‘हे’ स्टायलिश स्पोर्ट्सवेअर
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे सकाळी सकाळी उठून बाहेर पडणं आणि व्यायाम करणं कठीण होतं. पण कंटाळा न करता या दिवसांत शरीर उबदार ठेवण्यासाठी हलका व्यायाम करणं गरजेचं आहे. या दिवसांत संसर्गाचे आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे काही व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होते. तसेच दिवसभर उर्जेसाठी सकाळचा व्यायाम महत्त्वाचा असतो. थंडीत वर्कआऊट करताना काही आऊटफिटमुळे तुम्हाला स्टायलिश लुकसह उबदारपणा जाणवतो. ( Winter Workout Sportswear For Stylish Look )
आजकाल महिलांसाठी विंटर स्पोर्ट्सवेअर हे फॅशन, उबदारपणा आणि आरामदायी असे डिझाइन केलेले आहेत. जेणेकरून थंडीपासून बचाव होतो आणि व्यायाम करताना आरामदायीही वाटते.
थर्मल लेगिंग्ज
थर्मल लेगिंग्ज फिट आणि आरामदायी असतात. यामुळं धावणं, योग, दैनंदिन कामं करण्यास मदत होते. तसेच यामुळं जास्त थंडी जाणवत नाही. थर्मल वेअर घातल्यावर शरीर उबदार राहते आणि थंडीपासून बचाव होतो. पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स मिश्रित फॅब्रिकच्या थर्मल लेगिंग्ज हलके आणि लवचिक असतात. कारण स्पॅन्डेक्समुळे लेगिंग्ज ताणल्या जातात आणि शरीराच्या हालचाली करणं सोपं ठरतं.
जॅकेट
हिवाळ्यात व्यायामासाठी जॅकेट घालणे आवश्यक आहे. यासाठी हलके पण उबदार असलेले जॅकेट निवडा. स्वेट जॅकेट मऊ फॅब्रिकपासून बनते, हे जॅकेट शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. वर्कआउटसह ते दररोजच्या कॅज्युअल वापरासाठीही परिपूर्ण ठरतात. तसेच विंड/ वॉटरप्रूफ जॅकेट, झिपर जॅकेट देखील विंटर वर्कआऊटसाठी परफेक्ट ठरतात.
जॉगर्स
हिवाळ्यातील व्यायामासाठी जॉगर्स हे उबदारपणा आणि लवचिकत्यासाठी ओळखले जातात. यामुळं थंडीपासून तुमचे संरक्षण होतं. तसेच तुम्हाला शरीराच्या हालचाली करण्यास मदत होते. जॉगिंग, योगा किंवा व्यायामासह तुम्ही ते घरीही घातल्यास आरामदायी वाटते.
Comments are closed.