Legs Up Wall Yoga Pose: दररोजचा थकवा, मानसिक ताण करा दूर; महिलांसाठी ‘हे’ आसन ठरतं वरदान
दैनंदिन जीवनात स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. घरातील कामं, ऑफिसचा ताण वेगळा. यामुळं अनेकदा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी कमी वयात अनेक गंभीर व्याधी जडण्यास सुरूवात होते. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही दररोज अगदी १० मिनिटे वेळ काढून एक योगासन केलं तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अगदी बॉलिवूडची फिट अँड फाईन अभिनेत्री करीना कपूर देखील तिच्या फिटनेस रूटीनमध्ये न चुकता हे आसन करते. यामुळं थकवा, मानसिक ताण दूर होतो आणि शरीर तंदुरुस्त राहतं. ( Legs Up Wall Yoga Pose Benefits For Women’s Health )
हे आसन करायला अगदी सोपं असतं. त्या ‘विपरीतकरणी’ योगासन असं म्हणतात. शरीराच्या वरच्या भागाला आरामदायी स्थितीत ठेवून पाय उंचावणे म्हणजे विपरीतकरणी आसन होय. शरीरासह महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळं प्रत्येक महिलेने हे आसन करण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत वेळ काढावा असा सल्ला तज्ञ देतात. हे आसन अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला केवळ भिंतीवर पाय उलटे करून जमिनीवर पाठीवर झोपायचं असतं.
विपरितकरणी आसनाची योग्य पद्धत
हे आसन करण्यासाठी, भिंतीजवळ एक रिकामी जागा निवडा. तिथे योगा मॅट घाला. यानंतर मॅटवर झोपून तुम्ही भिंतीच्या आधाराने पाय उंच करा. दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडा. सुरुवातीला हे आसन तुम्ही १-३ मिनिटे करू शकता. मात्र सवय झाल्यावर तुम्ही १० मिनिटे हे आसन केल्यास फायदा होतो.
हेही वाचा: Surya Namaskar: दररोज सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
विपरितकरणी आसनाचे फायदे
या आसनाचे अनेक फायदे आहेत. जसे की, यामुळं पोटाच्या समस्या कमी होतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. चिंता, ताण आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरतं. स्नायूंमधील वेदना, ताण कमी होतो. झोपेची गुणवत्ता सुधारते, शरीराची लवचिकता वाढवते. रक्ताभिसरण आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही हे आसन उपयुक्त आहे.
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Comments are closed.