Vastu Tips: घरात आरशाला तडे गेलेत? वास्तुशास्त्रानुसार होतील गंभीर आर्थिक नुकसान

वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत ते घरासाठी महत्त्वाचे ठरतात. या नियमांमुळं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू घरात ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. फुटलेली किंवा तडा गेलेली काच आणि आरसा घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळं घरातील सदस्यांवर अनेक गंभीर परिणाम होतात. ( Vastu Tips For Broken Mirror )

फुटलेल्या आरशातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा घरातील वातावरण बिघडण्यास कारणीभूत ठरते. घरात वादविवाद निर्माण होतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव, अशांतता राहते. राग, चिडचिड आणि गंभीर मानसिक त्रास होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, फुटलेला आरसा आर्थिक नुकसानाचे सर्वात मोठं कारण ठरू शकतो. त्यामुळं घरात जास्त गंभीर आर्थिक अडचणी येतात. उत्पन्नाचे मार्ग अडतात आणि विनाकारण खर्चात वाढ होते. नोकरी किंवा व्यवसायात तोटा येतो.

हेही वाचा: Vastu Tips: चुकीच्या दिशेला ठेवू नयेत मौल्यवान वस्तू, घरात वाढतात आर्थिक अडचणी

घरात फुटलेला आरसा ठेवल्यास कोणत्याही कामांत अडथळे येतात. सुरू असलेले काम बंद होण्याची शक्यता असते. कोणत्याही क्षेत्रात अपयश येते. यामुळे हळूहळू आत्मविश्वास कमी होतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरात आरसा किंवा काच फुटलेली असेल तर घरातून काढून टाकावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि घरातील वातावरण शांत राहते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात लावण्यात येणाऱ्या आरशाचा आकार चौकोनी असावा. याशिवाय, घरात लावलेल्या आरशात तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे. आरशावर घाण असू नये, याची विशेष काळजी घ्यायला हवी.

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.

Comments are closed.