Types Of Diet : डाएटचे प्रकार किती आणि कोणते?
फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, योगा करतात किंवा डाएट फॉलो करतात. बहुतेकदा आपण कोणाकडून तरी ऐकून किंवा सल्ल्याने डाएट करतो. मात्र, तुम्हाला शरीर निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही डाएट फॉलो करणे हे चुकीचे आहे. डाएट फॉलो करण्याआधी तुम्हाला डाएटचे विविध प्रकार माहीत असायला हवेत. आज आपण जाणून घेऊयात डाएटचे ट्रेंडमध्ये असलेले विविध प्रकार.
लक्षपूर्वक खाणे
माईंडफूल इटींग म्हणजे खाण्याच्या अनुभवाबद्दल पूर्णपणे वर्तमानात प्रेझंट असणे आणि अधिक जागरूक असणे होय. खाताना पदार्थाच्या चवीचा आणि टेक्शरचा मनापासून आनंद घेणे. या डाएटमुळे अति खाणे टाळण्यास मदत होते. ज्यामुळे वजन वाढत नाही.
वैयक्तिक पोषण –
पर्सनलाईज न्युट्रिशनमध्ये तंत्रज्ञान, संशोधनातील प्रगती आणि वैयक्तिक पोषणाकडे लक्ष दिले जाते. या डाएटमध्ये एकसारखाच आहार नसतो. त्यामुळे प्रत्येकाची वैयक्तिक गरज लक्षात घेऊन हा डाएट तयार केला जातो.
हेही वाचा – Egg Expiry : अंड्याची एक्सपायरी कशी ओळखायची?
फ्लेक्सिटेरियन आणि रिड्यूक्टेरियन डाएट –
फ्लेक्सिटेरियन आणि रिड्यूक्टेरियन डाएटमध्ये शाकाहारी किंवा प्लाटं-बेस्ड डाएटमध्ये समावेश असतो. या डाएटमध्ये प्राण्यांच्या उत्पादनांचा वापर कमी प्रमाणात केला जाते.
कार्यात्मक अन्न –
फंक्शनल फूड्समध्ये असे फूड्स ज्यात मूलभूत पोषणापेक्षा अधिक मिळते. या डाएटमधील खाद्यपदार्थांमध्ये विविध पोषक घटक, बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आढळतात.
प्लांट बेस्ड आणि प्लांट फॉरवर्ड डाएट
प्लांट बेस्ड डाएट हा सध्या ट्रेंडिमध्ये असलेला डाएट आहे. प्लांट बेस्ड आणि प्लांट फॉरवर्ड डाएटमध्ये फक्त आणि फक्त वनस्पतींपासून प्राप्त झालेल्या अन्नाचा आहार घेतला जातो. यामध्ये फळे, भाज्या, धान्य, शेंगा, नट्स आणि सीड्स यांचे सेवन केले जाते.
एकदरंच डाएटचे विविध प्रकार पाहता पोषण आणि आहारात सतत वेगवेगळे ट्रेंड येत असतात. मात्र, तुम्ही निरोगी शरीरासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तो डाएट फॉलो करणे आवश्यक आहे.
Comments are closed.