या शहरात कधीच वाजत नाहीत बारा, घड्याळ्यात असतात फक्त 1 ते 11 आकडे
वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे वेळेला किंमत द्यावी असं कायम म्हटले जाते. दैंनदिन आयुष्यही घड्याळ्याच्या वेळेप्रमाणे चालते. वेळ पाहण्यासाठी घड्याळ्याची गरज असते. घड्याळ म्हटले की 1 ते 12 क्रमांक त्यात असतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का जगात असे एक शहर आहे जिथे घड्याळ्यात कधीच 12 वाजत नाहीत. चला जाणून घेऊयात हे शहर नक्की आहे कुठे आणि येथे घड्याळ्यात 12 का वाजत नाहीत?
जगातील प्रत्येक शहरात असणाऱ्या चौकात किंवा एखाद्या उंच टॉवरवर मोठे घड्याळ असते. मात्र स्वित्झर्लंडमधील सोलोर्थन या शहरातील घड्याळ्यात कधीच 12 वाजत नाहीत. येथील लोक 11 या क्रमांकासाठी इतके वेडे आहेत की त्यांनी घड्याळ्यात 12 हा आकडा ठेवलाच नाही. सोलोर्थन या शहरातील सर्व घड्याळात 12 आकडा नाही, फक्त 11 अंकापर्यंतच आकडे आहेत. शहरातील मुख्य चौकातील घड्याळही याला अपवाद नाही.
हेही वाचा – Aeroplane : जगातील एकमेव गाव जिथं घराबाहेर पार्क केलेली असतात विमानं
सोलोर्थन शहरातील नागरिकांना 11 हा आकडा खूप आवडतो. या शहारातील जुने धबधबे, म्युझियन आणि टॉवर यांचाही क्रमांक 11 आहे. इतकंच काय, शहरातील सेंट उसर्सचे मुख्य चर्च बांधण्यासाठी 11 वर्षे लागली. या चर्चला फक्त 11 दरवाजे आणि 11 खिडक्या आहेत. विशेष बाब म्हणजे येथील बहुतेक नागरिक 11 तारखेलाच वाढदिवस साजरा करतात.
11 आकड्यासाठी लोक इतके वेडे का?
11 आकड्याविषयी एक लोककथा सांगितली जाते. पूर्वी सोलार्थनमधील नागरिक मेहनत करूनही त्यांच्या वाट्याला दु:ख यायचे. त्या वेळी डोंगरावरून एल्फ नावाचा जादूई प्राणी आला. त्याच्याकडे अद्भूत शक्ती होत्या. त्याने लोकांना पुन्हा आनंदीत केले. त्यांचे आयुष्य सुखाने भरून गेले. जर्मन भाषेत एल्फ म्हणजे 11, त्यामुळे येथील नागरिकांचे 11 या आकड्याशी नाते बनले. एल्फच्या या प्रभावामुळे सोलोथर्नच्या घड्याळ्यावर 1 ते 11 चं आकडे दिसतात.
Comments are closed.