Food Poisoning Remedies: उलट्या, जुलाबाच्या त्रासाने हैराण झालात? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम

आजकालच्या धावपळीच्या जीवनात झोपेचा अभाव, असंतुलित आहारामुळं पोटाच्या समस्या वाढत आहेत. बाहेरचं खाणं, अनियमित दिनचर्या आणि ताणतणावामुळे अनेकदा उलट्या, जुलाब, गॅस आणि अपचन होते. अशा परिस्थितीत अगदी पूर्वीपासून काही घरगुती उपाय केले जातात. तहे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्वरित आराम मिळतो. ( Natural Remedies On Food Poisoning )

ओवा आणि काळं मीठ
ओवा हा पोटदुखी, गॅस आणि अपचनावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी अर्धा चमचा ओवा भाजून त्यात चिमूटभर काळं मीठ घाला. हे दोन्ही घटक कोमट पाण्यात मिसळून ते पाणी घ्या. यामुळे गॅस, पोटदुखीवर आराम मिळतो.

दही आणि साखर
उलट्या आणि जुलाबामुळं डिहायड्रेशन होतं. परिणामी अशक्तपणा जाणवतो. त्यावर उपाय म्हणून ताजे दही थोडी साखर मिसळून खाणे फायदेशीर ठरतं. यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि जुलाबाचा त्रास कमी होण्यास मदत होते. दिवसातून १-२ वेळा दही- साखर खाल्ल्याने बरं वाटतं.

हेही वाचा: Cough Remedies : छातीत कफ झालाय? करा हे घरगुती उपाय

बडीशेपचं पाणी
बडीशेपचं पाणी पिल्याने पोटातील जडपणा किंवा जळजळ यापासून आराम मिळतो. त्यासाठी रात्रभर पाण्यात एक चमचा बडीशेप भिजवून ठेवा, ते पाणी गाळून सकाळी घ्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्त कमी होते.

आल्याचा रस आणि मध
मळमळ आणि उलट्यांसाठी आलं खूप प्रभावी मानलं जातं. अर्धा चमचा मध आणि एक चमचा आल्याच्या रस मिसळा आणि खा. यामुळे उलट्या थांबतात आणि पोट शांत राहतं.

जिऱ्याचं पाणी
जिऱ्याचं पाणी पोटदुखीसाठी खूप फायदेशीर आहे. एक चमचा जिरे पाण्यात उकळून घ्या नंतर पाणी थंड करून गाळून प्या. यामुळं पचनक्रिया संतुलित राहते.

केळी आणि साधा भात
पोटाचे त्रास जाणवत असताना हलकं आणि सहज पचणारं अन्न घेणं आवश्यक असते. पिकलेले केळी आणि साधा उकडलेले भात खाल्ल्यास पोट शांत राहतं. तसेच शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. उलट्या, जुलाब होत असल्यास दिवसातून २-३ वेळा केळी आणि भात थोडा थोडा खावा.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments are closed.