Christmas Party Look : ख्रिसमस पार्टीत दिसा हटके, वापरा या फॅशन टिप्स
देशात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस सणाच्या दिवशी कित्येक ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. विशेष करून महिलांना, पार्टी छोटी असो वा मोठी पार्टीत उठून दिसायचं असते. महिला पार्टीसाठी आऊटफिटपासून ते अगदी मेकअपपर्यत सर्वाची तयारी करतात. तुम्ही सुद्धा ख्रिसमस पार्टीची तयारी करताय? पार्टीत तुम्हालाही हटके दिसायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला पार्टीसाठी हटके लूक कसा तयार करायचा याबद्दल सांगणार आहोत.
डोळ्यांचा मेकअप –
ख्रिसमस पार्टीचा मेकअप करण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर अधिक लक्ष द्यायला हवे. यासाठी आयशॅडो लाइट पिंक किंवा न्युट्रल रंगाच्या लावू शकता. यामुळे तुम्हाला साधा पण आकर्षक लूक नक्कीच मिळेल.
रेट्रो शैली –
ख्रिसमस पार्टीत डोळे आणखीनच आकर्षित करण्यासाठी रेट्रो स्टाइल विंग आयलायनर लावता येईल. ज्या पार्टीत जाणार असाल आणि तिथे रेट्रो स्टाइल असेल तर हा पर्याय उत्तम आहे.
हेही वाचा – Gift Ideas : सिक्रेट सांता आहात? मग या गिफ्ट्स आयडिया नक्की करा ट्राय
पोशाख –
ख्रिसमससाठी लाल किंवा पांढऱ्या रंगाची थिम साधारणपणे ठेवली जाते. लाल, पांढऱ्या कपड्यांसोबत शिमरी लूक करू शकता. ओठांसाठी गुलाबी रंग वापरा आणि गालांवर हायलायटर वापरायला विसरू नका.
फूटवेअर –
तुम्हाला शोभणारे फूटवेअर निवडा, विनाकारण नवीन ट्राय करायला जाऊ नये नाहीतर तुमचा लूक बिघडू शकतो. जर शॉर्ट ड्रेस घालणार असाल तर बूट घालावेत. गाऊन घालणार असाल तर हिल्स घालण्याला प्राधान्य द्यावे.
दागिने –
कपड्यांनुसार ज्वेलरी निवडायला हवी. ख्रिसमस पार्टीत आऊफिटसोबत तुम्ही स्टार रिंग ट्राय करू शकता.
हेही वाचा – Christmas Gifts : बच्चे कंपनीचा ख्रिसमस बनवा स्पेशल; द्या हे हटके गिफ्ट
Comments are closed.