Wedding Destinations : लग्नगाठ बांधण्यासाठी भारतातील ही मंदिरे उत्तम, लग्न होईल अविस्मरणीय

हल्ली धार्मिक स्थळी विवाह करण्याच्या ट्रेंड तरूणाईमध्ये दिसत आहे. अगदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे कित्येकजण मंदिरात देवांच्या साक्षीने लग्नगाठ बांधण्यास पसंती दर्शवत आहेत. तरूण जोडपी गोगांटमय डेस्टिनेशन वेडिंग्जऐवजी शांत, पवित्र आणि अध्यात्मिक ऊर्जा असलेल्या मंदिरांमध्ये विवाह करता आहेत. जर तुम्हालाही आयुष्याच्या नव्या प्रवासाटी सुरूवात पवित्र आणि शांक वातावरणात करायची असेल, तर भारतातील अनेक प्राचीन मंदिरे वेडिंगसाठी उत्तम ठरू शकतात.

बृहदेश्वर मंदिर

तमिळनाडूतील बृहदेश्वर मंदिर लग्न करण्यासाठी सर्वोत्तम मंदिर आहे. हे मंदिर तमिळनाडूच्या तंजावुर शहरात आहे. मंदिराची कलाकृती पाहण्यासारखी आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने लोक लग्न करण्यासाठ दूरवरून येतात.

मातंगेश्वर मंदिर

मातंगेश्वर मंदिरात शिवाची पूजा केली जाते. मध्य प्रदेशात हे मंदिर आहे. हे मंदिर सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु असते.

हेही वाचा – Solo Dating : तरुणांना लागलं सोलो डेटिंगचं वेड, पण हे नक्की आहे तरी काय?

त्रियुगीनारायण मंदिर

असे म्हणतात की, उत्तराखंडच्या या मंदिरात ज्या जोडप्याचे लग्न होते त्यांचे आयुष्य शिव-पार्वतीच्या आशीर्वादाने सुखाने भरून जाते. त्रियुगीनारायण मंदिराच्या आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीने या मंदिराच्या अग्निकुंडाला प्रदक्षिणा घातली होती. आजही हा अग्निकुंड आहे. लग्नगाठ बांधण्यासाठी हे मंदिर उत्तम पर्याय आहे.

तिरुमला मंदिर

तिरूमाला मंदिर आंध्र प्रदेशातील तिरूपती एस मडा सेंट येथे आहे. हे मंदिर आर्थिक समृद्धी आणि लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक इच्छित नवस मागण्यासाठी येथे येतात. लग्नगाठ बांधण्यासाठी हे मंदिर उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – Dating App Tips : डेटिंग ॲपवर ‘राईट स्वाइप’ कसा मिळतो? मुली मुलांच्या प्रोफाइलमध्ये नेमकं काय पाहतात

Comments are closed.