Health Tips : हिवाळ्यात ताक प्यावं की नाही ?
हिवाळ्यात ताक प्यावं की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. योग्य पद्धतीने घेतल्यास हिवाळ्यात ताक पिणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. पण मर्यादेत आणि योग्य प्रकारे प्याव. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते, त्यामुळे ताक शरीराला चांगलं मानवतं. मात्र खूप थंड किंवा फ्रीजमधून काढलेलं ताक टाळावं. ताक पिण्याचे काय फायदे आहेत आणि ते कश्याप्रकारे प्यावं हे आपण जाणून घेणार आहोत.
1. पचन सुधारतं
ताकामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांची कार्यक्षमता वाढवतात आणि बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी यावर फायदा होतो.
2. रोगप्रतिकारशक्ती वाढते
ताकामधील चांगले जिवाणू (Good bacteria) असतात जे सर्दी-खोकला, इन्फेक्शनपासून संरक्षण करायला मदत करतात.
3. शरीर उष्ण ठेवायला मदत
जिरे, आलं, मिरी, हिंग घालून ताक घेतल्यास शरीरात सौम्य उष्णता निर्माण होते.
4. वजन नियंत्रणात मदत
ताक हलकं आणि कमी कॅलरीचं असल्यामुळे हिवाळ्यात वजन वाढू नये यासाठी उपयुक्त ठरतं.
5. हाडांसाठी चांगलं
ताकात कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडं आणि दात मजबूत ठेवायला मदत होते.
हिवाळ्यात ताक कसं प्यावं?
1. रम टँटरने बाजू मांडली आहे
2. जेवणानंतर किंवा दुपारी पिणं उत्तम
3. जिरे पूड, सुकं आलं, मिरी, हिंग घालून घ्या
4. रात्री फॅक्टिंग आणि चिमूटभर टाळा
5. सर्दी-खोकला वाढलेला असेल तर थोडं टाळावं
कोणी काळजी घ्यावी?
1. वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांनी
2. सायनस, दमा असणाऱ्यांनी
हिवाळ्यात ताक प्यायला हरकत नाही, उलट योग्य पद्धतीने घेतल्यास ते पचन, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. फक्त थंड ताक टाळा
Comments are closed.