Best Road Trip Routes: न्यू इयरचे स्वागत करा खास, रोड ट्रीपसाठी ही ठिकाणं एकदम झकास
आजकाल सर्वांनाच प्रवास करायला आवडते. काहींना डोंगराळ ठिकाणी, काहींना शांत ठिकाणी तर काहींना समुद्र किनारी फिरायला आवडतं. शिवाय बऱ्याच जणांना विमान प्रवासापेक्षा रोड ट्रिप आवडते. आता ख्रिसमस, न्यू इयरच्या ट्रीपची प्लॅनिंग अनेक जण करत असतील. तुम्ही जर यंदाच्या न्यू- इयर ट्रीपसाठी काही लोकेशनच्या शोधात असाल तर रोड ट्रिपसाठी काही ठिकाणं परफेक्ट ठरतात.
कोकण
महाराष्ट्र ते गोवा हा ६०० किमीची रोड ट्रिप तुम्ही करू शकता. अरबी समुद्राच्या काठाने रस्त्याने हा प्रवास असतो, हिरव्यागार टेकड्या आणि शांत समुद्रकिनारे तुमचं मन मोहित करतात. मुंबई किंवा पुण्यापासून सुरुवात करून रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून हा प्रवास करता येतो. या ट्रिपला २ ते ३ दिवस लागू शकतात.
मनाली ते स्पीती व्हॅली
४३० किमीचा हा प्रवास करण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात. ही रोड ट्रिप तुम्हाला हिमालयाच्या उंच भागात घेऊन जाते, जिथे रस्ते अरुंद आणि धोकादायक आहेत. मनाली ते काझा हा प्रवास तुम्हाला जिप्सा, सरचू आणि इतर सुंदर ठिकाणांमधून घेऊन जातो.
लेह लडाख सर्किट
ही रोड ट्रिप तुम्हाला लडाखच्या उंच थंड वाळवंटातून घेऊन जाते, जिथे चित्तथरारक रस्ते असू शकतात. या ट्रीपला लेहपासून सुरुवात करता येते, पँगोंग त्सो, खारदुंग ला, नुब्रा व्हॅली आणि श्योक नदी रस्त्यात लागते. हा प्रवास ४०० किमीचा असून तो पूर्ण करण्यासाठी ४-५ दिवसांचा वेळ लागतो.
पश्चिम घाट
तुम्हाला जर ३ दिवसांपेक्षा कमी रोड ट्रिप प्लॅन करायची असेल तर पुणे ते बेळगाव हा प्रवास ३०० किमीचा आहे आणि २ दिवसांचा असू शकतो. ही रोड ट्रिप तुम्हाला पश्चिम घाटाच्या हिरव्यागार टेकड्यांमधून घेऊन जाते, जिथे वळणदार रस्ते आहेत. या ट्रीपला पुण्यापासून सुरुवात करून सातारा, पंचगणी आणि महाबळेश्वरमध्ये तुम्ही काही ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.
Comments are closed.