Ameet Satam : अमित साटम यांनी चमकवले कामगारांचे बूट; कारण काय?

मुंबई : भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज (22 डिसेंबर) दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थिती लावली. या मेळाव्यात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. उपस्थित बांधवांना संघटनशक्तीचे महत्त्व, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच सन्मानजनक जीवनमान याविषयी मार्गदर्शन केले. कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर ठोस कृतीतून पाहिले पाहिजे, हा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.

Comments are closed.