Merry Christmas Wishes Quotes 2025: ख्रिसमसनिमित्त मित्र मंडळींना पाठवा खास शुभेच्छा !

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. सरत्या वर्षाचा शेवट आनंदी आणि गोड करणाऱ्या या सणाचा आनंद ख्रिश्चन धर्मीयांबरोबर सर्वच धर्मांचे लोक घेत असतात. यानिमित्त अनेक जण सोशल मीडियावर स्टेटस ठेवतात किंवा आपल्या मित्रमंडळींना शुभेच्छा पाठवत असतात. चला तर मग जाणून घेऊया ख्रिसमससाठी काही खास शुभेच्छा.. ( Merry Christmas 2025 Wishes and Quotes in Marathi )

प्रेम, आनंद व समृद्धीने भरलेल्या आनंददायी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला
विनंती आमची येशूला,
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला !
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन निरोगी आणि कायम बहरलेले असो हीच प्रार्थना..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ,
आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा !

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार,
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हालाही आनंदाचा जावो हा ख्रिसमसचा सण वारंवार !

नाताळाचा सण,
सुखाची उधळण !
मेरी ख्रिसमस !
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा !

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा !

Comments are closed.