Rose Plant Care Tips: थंडीत गुलाबाच्या फुलांनी बहरेल रोप; अशी घ्या काळजी

हिवाळ्यात रोपांची निगा राखणे कठीण असते. त्यातच बागकामाची आवड असणाऱ्यांच्या यादीत गुलाबाचे झाड हे पहिल्या क्रमांकावर असते. थंडीत गुलाबाच्या रोपाची काळजी घेतली तर भरपूर फुले येतात. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. अगदी एक छोटा घटक वापरून तुम्ही या झाडाची निगा राखू शकता. आपल्या सर्वांकडे घरी तुरटी ही हमखास असते. याच तुरटीचा वापर करून गुलाबाचे रोप निरोगी होते. ( How to take care of rose plant in winter )

तुरटी जमिनीतील हानिकारक कीटक आणि बुरशी काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा झाडाची मुळे निरोगी असतात तेव्हा त्याचा थेट परिणाम फुलांवर होतो. त्यामुळे गुलाबाच्या झाडासाठी तुरटीचे पाणी तयार करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात थोडी तुरटी घाला आणि नीट ढवळून घ्या. हे पाणी झाडाच्या मुळांना द्या. जर तुम्हाला हे पाणी तयार करण्यासाठी वेळ नसेल तर तुरटी बारीक करून मातीत घाला. महिन्यातून एकदा हा उपाय केल्यास मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही आणि गुलाबाचे झाड निरोगी राहते.

सूर्यप्रकाश
तुरटीच्या पाण्यासह या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, पाणी, वेळोवेळी छाटणी आणि नैसर्गिक खते देणे देखील आवश्यक आहे. गुलाबाच्या रोपांना दररोज किमान ५-६ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिवाळ्यात जास्त सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे काही वेळ उन्हात हे रोप ठेवा.

पाणी
हिवाळ्यात जास्त पाणी दिल्याने झाडाच्या मुळांना नुकसान पोहोचते. म्हणून माती कोरडी झाल्यावरच झाडाला पाणी घाला.

छाटणी
हिवाळ्याच्या सुरुवातीला रोपाच्या कमकुवत फांद्या छाटून टाका. यामुळे नवीन फांद्यांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे अधिक फुले येतात.

हेही वाचा: Winter Gardening Tips: हिवाळा संपण्यापूर्वी बागेत लावा ‘ही’ झाडं; वर्षभर खायला मिळतील सेंद्रिय आणि ताज्या भाज्या

खते
मोहरीचा पेंड, गांडूळखत किंवा शेण गुलाबांसाठी फायदेशीर खते आहेत. दर १५-२० दिवसांनी एकदा रोपाला हे खत घालणे पुरेसे असते.

तुरटीचा योग्य वापर
महिन्यातून फक्त एकदाच तुरटीचे पाणी द्या. जास्त वापरामुळे मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. या उपायांचा अवलंब करून तुम्ही हिवाळ्यातही तुमच्या गुलाबाच्या रोपांना निरोगी आणि फुलांनी भरलेले ठेवू शकता.

Comments are closed.