Garlic : काळ्या आणि पांढऱ्या लसणात फरक काय?

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भारतीय जेवणात जवळपास सर्वंच पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणामुळे पदार्थांची चव तर वाढतेच याशिवाय शरीराला आवश्यक पोषकतत्वे देखील मिळतात. सर्वसाधारणपणे पांढऱ्या लसणाचा वापर जेवणात केला जातो. पण बाजारात पांढऱ्या लसणासह काळा लसूणही मिळतो. बऱ्याच लोकांना पांढरा आणि काळा लसूण यातील फरक माहीत नाही. आज आपण काळ्या आणि पांढऱ्या लसणात काय फरक आहे ? आरोग्यासाठी कोणता उत्तम हे जाणून घेऊयात.

काळा लसूण –

काळा लसूण लसणाचा वेगळा प्रकार नाही. आपण दररोज वापरत असलेला लसूण काही आठवड्यांसाठी नियंत्रित तापमानात ठेवला जातो. या प्रक्रियेदरम्यान त्यात रासायनिक बदल होतात, ज्यामुळे पांढरा लसूण काळा होतो.

फायदे –

  • काळ्या लसणात ऍंटीऑक्सिडंट्स असतात. हे ऍंटी-ऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
  • काळ्या लसूणमध्ये एलिसिन्स कमी असतात, ज्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. जर तुम्हाला पोटाच्या तक्रारी असतील तर पदार्थांत काळ्या लसणाचा वापर करण्यास सुरूवात करावी.
  • काळे लसूण नियमित खाल्ल्यास रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काळा लसूण खावा.
  • वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर काळे लसूण खा. वजन कमी करण्यासाठी काळे लसूण उत्तम पर्याय आहे.

सेवन कसे कराल?

काळा लसूण कोशिंबीर, सूप आणि विविध पदार्थांत वापरू शकता.

काळ्या आणि पांढऱ्या लसणात फरक काय?

तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या लसणात एलिसिन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात असतो. या पदार्थांमुळे यातील जीवाणू नष्ट होतात. पण काही लोकांना हा लसूण खावून त्रास होऊ शकतो.

काळ्या लसणातील एलिसिन एका स्थिर ऍंटी-ऑक्सिडेंट्समध्ये बदलते. विशेष करून एस-एलिल सिस्टीन नावाचा पदार्थ शरीरात सहजपणे ऍब्जॉर्ज होतो. त्यामुळे काळा लसूण ऍंटी-ऑक्सिडंट्ससाठी उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा – Health Tips: आवळा खाताना काय काळजी घ्यावी ?

Comments are closed.