Cauliflower Buying Tips: फुलकोबी खरेदी करताना ‘या’ गोष्टी तपासा; कीटकांचा असू शकतो प्रादुर्भाव
हिवाळ्यात फुलकोबी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. या दिवसांत ताजी आणि पांढरीशुभ्र फुलकोबी मिळते. पण कधीकधी बाहेरून ताजी आणि स्वच्छ दिसणाऱ्या फुलकोबीमध्ये कीटक असू शकतात. म्हणूनच फुलकोबी खरेदी करताना काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया… ( Tips for buying cauliflower )
नेहमी पांढरी फुलकोबी खरेदी करा. जर फुलकोबीवर लहान काळे किंवा गडद तपकिरी डाग असतील तर त्यावर बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव असू शकतो.
फुलकोबी ही घट्ट असल्यास त्यात कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. जर फुलकोबी पोकळ असेल तर त्यात कीटक सहजपणे जमू शकतात. शिवाय अशी कोबी चवीलाही चांगली लागत नाही.
कोबीच्या कडेला असलेली पाने फ्रेश आणि गडद हिरव्या रंगाची असावीत. कारण हिरवी पाने ही जंतूमुक्त असतात. याउलट पाने सुकलेली किंवा पिवळी पडलेली असतील, तर याचा अर्थ कोबी शिळी असू शकते. त्यासाठी कोबी उलटा करा आणि देठ तपासा. जर देठामध्ये छिद्रे दिसत असतील तर अशाप्रकारचे फुलकोबी घेणे टाळा.
कोबी हातामध्ये घेतल्यावर आकारमानापेक्षा थोडी जड असावा. जड कोबीमध्ये ओलावा चांगला असतो आणि आतून पोकळी नसते. कोबी घरी आणल्यावर कोमट मीठ पाण्यात किंवा हळदीच्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवा. यामुळे कीटक नाहीसे होतात.
Comments are closed.