Temple : भारतात आहे यमाचे मंदिर, बाजूने जायलाही घाबरतात लोक

भारतातील मंदिरे, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात काही पौराणिक मंदिरे देखील आहेत, ज्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या मृत्यू देवता यमदेवाच्या मंदिराबाबत सांगणार आहेत. भारतातील प्रत्येक मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करतात पण यमदेवाच्या या मंदिरात कधीच कोणी फिरकत नाही.

यमराजाच्या या मंदिरात अनेक रहस्ये दडलेली आहेत. असं म्हणतात की, या मंदिरात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा येथे येतो. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर या ठिकाणी यमदेवाचे हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराची रचना खूप साधी असून ते एखाद्या घरासारखे दिसते. या ठिकाणी एक रिकामी खोली आहे. ज्यात यमदेव वास करत असल्याचं म्हटलं जातं. या खोलीला ‘यमराज दरबार’ म्हणतात. याशिवाय मंदिरातील दुसऱ्या एका खोलीमध्ये चित्रगुप्त वास करतात असे सांगितले जाते.

असे म्हटले जाते की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमदेवाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला या ठिकाणी घेऊन येतात. त्यानंतर चित्रगुप्त सर्व पाप-पुण्याची माहिती त्या आत्म्याला सांगतात. यावेळी त्या मृत व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जाणार की नरकात हे चित्रगुप्त त्याला सांगतो. मग त्यानंतरचा निर्णय यमदेव घेतात. यमदेवाच्या निर्णयानंतर यमदूत आपल्या कर्मानुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात.

मंदिरात चार अदृश्य दरवाजे

गरुड पुराणात वर्णन केल्याप्रमाणे यमदेवाच्या दरबाराला चार दरवाजे आहेत. असे म्हटले जाते की, या मंदिराला देखील चार अदृश्य दरवाजे आहेत. हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंपासून तयार केले आहेत. या मंदिराला लोक धर्मेंश्वर महावेद मंदिर , धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून ओळखतात. हिमाचल येथे अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत त्यांपैकी एक हे आहे. पण इतर मंदिराप्रमाणे या मंदिरात लोक जात नाही, ज्यांना नमस्कार करायचे आहे ते बाहेरूनच करतात.

हेही वाचा – Mikami Shrine Kyoto: भक्तीचा चमत्कारिक अनुभव; इथं पूजा केल्यावर टकल्यांना येतात केस

Comments are closed.