New Year Party: 31st च्या पार्टीवेळी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण आतूर असतात. यामुळे 31 डिसेंबरची पार्टी ही सगळ्यांसाठीच खास असते. मित्रमंडळी, संगीत, नाच-गाणे आणि जल्लोष यामध्ये आपण इतके रमून जातो की काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मात्र, ही रात्र आनंदात आणि सुरक्षितपणे साजरी व्हावी यासाठी काही आवश्यक काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 31 च्या पार्टीसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊया. (new year party celebration security)

1. सुरक्षितता
जास्त फटाके टाळा, विशेषतः घरात/बिल्डिंगमध्ये
लहान मुलांपासून फटाके व दारू दूर ठेवा
फायर एक्स्टिंग्विशर किंवा पाणी जवळ ठेवा

2. आवाजाची मर्यादा
मोठ्या आवाजात DJ / म्युझिक उशिरापर्यंत लावू नका
शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
सोसायटीचे नियम आधी तपासा

3. अन्न-पाणी नियोजन
जास्त तेलकट किंवा जुने अन्न टाळा
शुद्ध पिण्याचं पाणी आणि सॉफ्ट ड्रिंक्स ठेवा
वेगवेगळ्या वयाच्या लोकांसाठी पर्याय ठेवा

4. दारू असेल तर मर्यादा
ड्रिंक करून वाहन चालवू नका
ड्रायव्हरसाठी वेगळं नॉन-अल्कोहोलिक पर्याय ठेवा
कोणावरही जबरदस्ती करू नका

5. वेळेचं नियोजन
पार्टी कधी सुरू, कधी संपणार ते ठरवा
12 नंतर शांतता पाळण्याचा विचार करा

6.स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन
कचऱ्यासाठी वेगळी पिशवी ठेवा
पार्टी नंतर परिसर स्वच्छ ठेवा

Comments are closed.