Face Steam: चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो, स्किनकेअर रूटीनमध्ये समाविष्ट करा फेशियल स्टीमिंग
बहुतांश वेळा सर्दी, खोकला झाल्यावर वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे काही वेळाने खोकल्यापासून आराम मिळतो. मात्र केवळ सर्दी खोकला झाल्यावरच नव्हे तर त्वचेसाठी देखील नियमितपणे वाफ घेण्याचा फायदा होतो. स्किनकेअर रूटीनमध्ये फेशियल स्टीमिंग ही एक जुनी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ दिल्याने त्वचेची खोलवर स्वच्छता होते. मात्र वाफ घेण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत तज्ञांनी माहिती दिली आहे. ( Face Steam Benefits for Skin )
तज्ञांच्या मते, साध्या पाण्याने वाफ घेण्यापेक्षा पाण्यात दोन घटक मिसळून वाफ घेतल्याने जास्त फायदा होतो. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते आणि चेहरा उजळतो. यासाठी एका भांड्यात पाणी उकळवा त्यात काही संत्र्याची साले आणि बीटरूटच्या पानांचे तुकडे घाला. या गरम पाण्याने चेहऱ्याला वाफ घ्या.
हेही वाचा: Skin Toner : घरच्या घरी बनवा असं बनवा नैसर्गिक टोनर
असे होतात फायदे:
संत्र्याच्या साली आणि बीटरूटच्या पानांमुळे त्वचेचे छिद्र उघडतात आणि जीवनसत्त्वांचा नैसर्गिक पुरवठा होतो. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर ठरते. तज्ञांच्या मते, आठवड्यातून तीन वेळा ही फेस स्टीम घेऊ शकता. शिवाय जर तुमची त्वचा कोरडी असेल तर वाफ घेण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.
Comments are closed.