New Year 2026: नववर्षात घरात ‘या’ दिशांना लावा ही रोपं , बदलेल नशीब

नववर्षांरंभास अवघे काही दिवस उरले आहेत. येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि आनंदाचे जावो अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुमचीही हीच इच्छा असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या चार दिशांना काही ठराविक रोप लावावीत . जेणेकरून घरात सुख,शांती, समृद्धी तर येईलच पण घरात सकारात्मक उर्जाही प्रवाहीत राहील. त्यासाठी घरात कोणती रोपं लावावीत ते बघूया.

तुळशी

नवीन वर्षात घरात तुळशी लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. त्यामुळे घऱावर महालक्ष्मीची कृपा राहते.

केळ्याचे झाड

वास्तुशास्त्रानुसार घरात केळ्याचे झाड उत्तर पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. केळ्याच्या झाडाला भगवान विष्णुचे प्रतिक मानले जाते. यामुळेच भगवान विष्णुच्या पुजेत केळ्याच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे. धर्मशास्त्रानुसार, घरात, अंगणात केळ्याचे झाड लावल्यास सुख समृ्ध्दी कायम नांदते. लग्नात अडचणी येत नाहीत.

मनी प्लांट
नववर्षाच्या पहील्याच दिवशी घरात मनी प्लांट लावणे शुभ आहे. मनी प्लांट घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावा. त्यामुळे घरात आर्थिक स्थिरता राहते.

शमी

शमीच्या रोपाची पूजा केल्याने महादेव आणि शनिदेवाची कायम कृपा लाभते. घरात सुख समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप दक्षिण दिशेला लावल्यास लाभ होतो. शनिदोषापासून मुक्ती मिळते.

Comments are closed.