केसांना बिअर लावण्याचा ट्रेंड कितपत योग्य?

केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांच्या यादीत आता बीअरचाही समावेश झाला आहे. सध्या जगभरात केसांच्या वाढीस चालना मिळण्यासाठी बिअरचा वापर करण्याच्या ट्रेंड सुरू आहे. काही लोकांच्या मते बिअरमधील घटकांमुळे केस मजबूत, चमकदार आणि निरोगी होतात. पण खरंच केसांच्या आरोग्यासाठी बिअर उपयुक्त आहे का? यातील घटकांमुळे केसांच्या समस्या कमी होतात का? जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरे,

जगभरात नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. सेलिब्रेशनमध्ये अनेक जण बिअरचे फेसाळलेले मग हातात घेऊन नववर्षांत स्वागत करतील. मात्र आता बिअरचा ग्लास हा सेलिब्रेशनसाठी नाहीतर केसांच्या सौंदर्यासाठीही वापरण्यात येत आहे. बिअर शॅंम्पू, बिअर हेअर पॅक आदी पद्धतीने हेअर केअर रुटीनमध्ये बिअरचा समावेश करण्यात येत आहे. काही तज्ज्ञमंडळीनी केसांना बिअर लावण्याचे फायदे सांगितले आहेत.

फायदे –

  • बिअरमध्ये प्रोटीन, बी व्हिटॅमिन आणि फ्लेवोनॉइडसारखे ऍंटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात.
  • बिअरमध्ये सेलेनियम आणि सिलिकॉन खनिजे असतात. याच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात आणि गळतात. त्यामुळे केसांसाठी बिअर उपयुक्त मानली जाते.

हेही वाचा – Face Steam: चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो, स्किनकेअर रूटीनमध्ये समाविष्ट करा फेशियल स्टीमिंग

  • व्हिटॅमिन बी आणि बी 12 केस अकाली पांढरे होऊ देत नाही. बिअरमध्ये हे दोन्ही घटक असतात.
  • झिंक, फोलेट, बायोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी बिअरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. हे घटक केस तुटणे, खराब होणे या समस्या कमी करतात.
  • केसांतील कोंडा कमी करण्यासाठी अनेक महिला बिअरचा वापर करतात. यामागील वास्तव पाहता बिअरमध्ये बुरशीजन्य घटक विरोधी गुण असतात. ज्यामुळे कोंडा कमी होतो.
  • ज्या व्यक्तीचे केस संवेदनशील आहेत अशांनी हेअर एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊनच केसांवर बिअर लावावी असे तज्त्र सांगतात.

वापरण्याची पद्धत –

  • बिअर खरेदी करताना उत्तम क्लालिटीची करावी  तसेच एक्सपायरी डेटही तपासावी.
  • बिअरने केस धुण्याआधी फ्रिजमधून अर्धा तास आधी बाहेर काढावी.
  • बॉटल सामान्य झाल्यावर वापरावी.
  • थंड बिअर केसांवर वापरू नये.
  • तुमचा नेहमीचा शॅंम्पू केसांना लावा आणि धुवा.
  • आता कंडीशनर लावू नका. त्याऐवजी केसांच्या लांबीनुसार केसांवर बिअर ओता.
  • हलक्या हाताने मालिश करा.
  • नंतर केस पाण्याने धुवा.

टीप – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा –

Comments are closed.