Blue Turmeric: पिवळ्या हळदीपेक्षा वेगळी, जाणून घ्या निळ्या हळदीचे महत्त्व

हिळद म्हणटलं की आपल्या समोर नेम्ही पिवळा रंग येणं सहाजीक आहे. परंतु तुम्ही कधी निळ्या हळदीबद्दल ऐकलंय का ? निळी हळद असते तरी काय हे तुम्हाला ठाऊक आहे का ? तेच आपण आता जाणून घेणार आहोत.

निळी हळद ही पारंपरिक पिवळ्या हळदीपेक्षा वेगळी आणि दुर्मिळ अशी औषधी वनस्पती आहे. तिला इंग्रजीमध्ये ब्लॅक टर्मरिक असे म्हणतात. बाहेरची रचना साध्या हळदीसारखीच दिसते, मात्र आतला कंद निळसर किंवा काळपट रंगाचा असतो. निळी हळद प्रामुख्याने भारताच्या ईशान्य भागात तसेच मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांत आढळते. आयुर्वेदात निळ्या हळदीला विशेष महत्त्व असून ती फार औषधी आहे. त्यामुळेचे बाजारात या हळदीला 500 ते 2,000 रूपयांपर्यंत दर मिळत आहे.

निळ्या हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंटस आणि अँटी-इन्फेमेटरी फार असतात. निळी हळद रोज अर्धा ते एक चमचा दूध किंवा पाण्यात मिसळून घेता येते. तसंच निळ्या हळदीचे नेमके काय फायदे आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत.

1. कर्करोगावर प्रभावी ठरते:
निळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहरोधक गुणधर्म आढळतात, जे शरीरातील हानिकारक घटकांशी लढण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार ती कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते, मात्र वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो.

2. रोगप्रतिकार शक्ती वाढवते:
निळी हळद शरीराची रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यास मदत करते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते.

3. त्वचारोग:
निळ्या हळदीतील जंतुनाशक गुणधर्म त्वचेवरील संसर्ग, खाज आणि पुरळ कमी करण्यास मदत करतात. ती त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

4. सांधेदुखी:
निळ्या हळदीत वेदनाशामक आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी, संधिवात आणि सूज यावर आराम मिळण्यास मदत होते.

Comments are closed.