MNS : मनसेचा पहिला शिलेदार मैदानात, राज ठाकरेंनी दिला यशवंत किल्लेदारांना एबी फॉर्म
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अशामध्ये आता निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी रेलचेल सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युती केल्यानंतर कोणत्या प्रभागात कोणाला तिकीट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर आता सोमवारी (29 डिसेंबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
Comments are closed.