Eye Makeup Tips : न्यू इयर पार्टीसाठी असा करा ग्लिटर आय मेकअप

न्यू इयर पार्टीची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. पार्टी म्हटले की छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. ड्रेस, ज्वेलरी पासून ते अगदी मेकअपपर्यत. मात्र यावर्षीच्या पार्टीत तुम्हाला हटके आणि आकर्षक लूक हवा असेल तर आउटफिटसोबत ग्लिटरी आय मेकअप ट्राय करा. पार्टीला जाताना आपण कपडे, शुज आणि मेकअप करतो. पण आय मेकअपकडे बहुकेकदा दुर्लक्ष होते. आय मेकअप करणे थोडे अवघड असले तरी या मेकअपमुळेच संपूर्ण लूक बदलतो आणि आपल्याला एक युनिक लूक मिळतो. आज आपण जाणून घेऊयात पार्टीसाठी ग्लिटरी आय मेकअप कसा करायचा आणि त्याचे प्रकार किती?

मोनोक्रोमॅटिक डोळा मेकअप

सध्या मुलींमध्ये मोनोक्रोमेटिक आय मेकअप खूप ट्रेंडिंग आहे. या मेकअपसाठी एकच आयशेडो वापरला जातो. यासाठी सर्वप्रथम डोळ्यांना प्रायमर आणि कंन्सिलर लावा. यानंतर ड्रेसला मॅच होईल, असे आय शॅडोस निवडा. तुम्ही ब्रशच्या मदतीने आयशॅडो लावू शकता. चांगलं ब्लेंड करून घ्या आणि तुमचा मोनोक्रोमेटिक आय मेकअप तयार…

हेही वाचा – New Year 2026 Gift Ideas: न्यू- इयरला पार्टनरला करा खुश; जाणून घ्या भन्नाट आणि बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडिया

ग्रेडियंट डोळा मेकअप

पार्टीसाठी ग्रेडिएंट आय मेकअप परफेक्ट आहे. हा मेकअप करण्यासाठी डोळयांवर गोल्डन किंवा सिल्वर असे रंग वापरावे लागतात. हे दोन रंग मिक्स करून तुम्हाला एक परफेक्ट पार्टी लूक मिळतो. अशाप्रकारे पार्टीला ग्लिटरी आय मेकअप करू शकता.

डोळ्यांचा मेकअप कस करायचा?

  • सर्वप्रथम डोळ्यांच्या आसपासची त्वचा स्वच्छ करा.
  • डोळ्यांखाली प्रायमर लावा, ज्यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकेल.
  • जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर कंन्सिलर वापरा.
  • आयशॅडो ब्राउन किंवा मरून लावा.
  • डोळ्यांच्या वरच्या पापण्यांना आयलाइनर वापरा.
  • पार्टीसाठी चमकदार किंवा स्मोकी आयशॅडो खूप सुंदर दिसतील.

हेही वाचा – New Year 2026 Party Outfit Ideas: न्यू- इयर पार्टीला ट्राय करा ‘हे’ आऊटफिट्स; मिळेल ग्लॅमरस लूक

Comments are closed.