New Year’s Resolutions : नवीन वर्षाचे संकल्प का होतात फेल ?

नवीन वर्ष, नवीन सुरुवात.. 2025 संपून 2026 सुरु होण्यास काही तासच शिल्लक आहेत. नवीन वर्ष आलं की विविध संकल्प केले जातात, जसे की काहीतरी नवीन शिकणे किंवा वाईट सवय सोडणे. आपल्याला वाटते की आपण हे संकल्प नक्कीच पूर्ण करू, मात्र हे संकल्प कधी कधी दोन दिवसातच मोडतात. नवीन वर्षाचे संकल्प का अयशस्वी होतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आजच्या लेखात आपण नवीन वर्षाचे संकल्प मोडण्याची कारणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग याविषयी जाणून घेऊयात

जास्त अपेक्षा :

संकल्प करताना आपण अनेकदा इतके उत्साही होतो की आपल्या स्वतःकडून खूप अपेक्षा असतात. वजन कमी करणे, नवीन भाषा शिकणे आणि करिअरमध्ये पुढे जाणे अशी अनेक उद्दिष्टे आपण एकाच वेळी ठरवतो, पण एकाच वेळी इतकी उद्दिष्टे पूर्ण करणे खूप कठीण असते.

संयमाचा अभाव :

नवीन वर्षाचा संकल्प न टिकण्यामागे संयमाचा अभाव कारण ठरतो. संकल्पात नवीन सवयी अंगिकारल्या जातात. मात्र सवयी बदलायला वेळ लागतो हे आपण लक्षात घेत नाही. हळूहळू आणि सतत प्रयत्न करूनच आपण यशस्वी होऊ शकतो.

हेही वाचा – New Year 2026 Health Resolution: नव्या वर्षी घ्या आरोग्याचा संकल्प; आहारात टाळा ‘हे’ पदार्थ; राहाल फिट अँड फाईन

योजनेचा अभाव :

नवीन वर्षाचे संकल्प करताना आपण ध्येय कसे साध्य करू याचा विचार करत नाही. आपण केवळ हेतूच्या आधारावर काम करतो, पण लक्षात ठेवा की केवळ इच्छाशक्ती असणे पुरेसे नाही. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठोस योजना आखून त्याचे पालन करावे लागणेही महत्त्वाचे आहे.

सामाजिक दबाव:

अनेकदा सोशल मीडिया किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन नवीन वर्षाचे संकल्प ठरवले जातात. आपण इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखतो आणि आपल्यासाठी योग्य नसलेले संकल्प करतो.

कमकुवत हेतू :

अनेक वेळा आपण आपल्या संकल्पांचे पालन करण्यात अपयशी ठरतो कारण आपले हेतू कमकुवत असतात. जेव्हा आपल्याला कोणतीही अडचण येते तेव्हा आपण सहजपणे हार मानतो.

संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी काय कराल?

  • ध्येय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभागून घ्या. उदाहरणार्थ, तुमच्या ध्येयाकरता दिवसातील दररोजचा 30 मिनिटांचा वेळ काढा.
  • तुमचे ध्येय SMART म्हणजेच Specific, Measurable, Attainable, Relevant, Time Bound असायला हवे.
  • दररोज किमान तीन गोष्टी लिहिण्याची सवय लावा. यासाठी दररोज रोजनिशी लिहू शकता.
  • रोज डायरी लिहिल्याने ध्येयांचा मागोवा घेणे सोपे जाईल. संकल्प करताना प्रेरक पुस्तके, व्हिडिओ किंवा कोट्स वाचा.
  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा आणि येणाऱ्या अडथळ्यांना घाबरू नका.

हेही वाचा – New Year Vastu Tips : नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा या गोष्टी, वर्षभर मिळतील शुभ परिणाम

Comments are closed.