New Year 2026 : देवदर्शनाने करा नववर्षाची सुरुवात, वाचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिराची यादी

हिंदू धर्मात कोणत्याही कार्याआधी देवाचे दर्शन घेतले जाते. नवीन वर्ष देखील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. येणारे नववर्ष नवीन आशा, ऊर्जा आणि एक नवीन सुरूवात घेऊन येते. त्यामुळे हे वर्ष सुख, शांती आणि समृद्धीने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतात यासंदर्भात एक श्रद्धा आहे की, देवाच्या भेटीने नववर्षाची सुरूवात करावी. म्हणूनच अनेकजण 1 जानेवारीला मंदिरांना भेट देतात. या दिवशी देवाचे दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाची सुरूवात सकारात्मक होते. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे जिथे देवाच्या आशीर्वादाने नववर्षाची सुरूवात करता येईल.

सिद्धीविनायक मंदिर, दादर

श्री सिद्धीविनायक मंदिर हे श्री गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर मुंबईतील प्रभादेवी भागात आहे. दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येथे येतात. येथे येऊन वर्षातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना बाप्पाकडे करतात.

श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर

विठूरायाच्या दर्शनाने तुम्ही वर्षाची सुरूवात करू शकता. दरवर्षी नवीन वर्षानिमित्ताने मंदिर सजवले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा काठावर वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

हेही वाचा – New Year Vastu Tips : नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा या गोष्टी, वर्षभर मिळतील शुभ परिणाम

इस्कॉन मंदिर

मुंबईतील जुहू बीचपासून काही अंतरावर असलेल्या इस्कॉन मंदिरात 1 जानेवारीला जाऊ शकता. हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित असून संगमरवर आणि काचेपासून बनवण्यात आलं आहे. नववर्षात प्रेम, जिव्हाळा असावा असे वाटत असेल तर श्री कृष्णाचे नक्कीच दर्शन घेऊ शकता.

त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. नववर्षाची सुरूवात महादेवाच्या दर्शनाने करू शकता. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतीक असलेले शिवलिंग आहे, जे गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर –

कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नववर्षाची सुरूवात करता येईल. हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तिपीठ आहे, जे भक्ती, इतिहास व स्थापत्यकलेचा उत्तम संगम आहे.

अक्कलकोट –

अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून १९व्या शतकातील महान संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात. येथे अन्नछत्र, राहण्याची सोय, तसेच स्वामींच्या जीवनप्रदर्शनासाठी संग्रहालय आहे

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे केवळ भौतिक पूजा स्थळे नाहीत, तर ती आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे नमुने आहेत. तुम्ही नववर्षाची सुरूवात सकारात्मक करण्यासाठी या मंदिरात भेट देऊ शकता.

हेही वाचा – Vastu Tips : नवीन वर्षात आणा या गोष्टी; वर्ष जाईल सुख-समाधानात

Comments are closed.