Goa Tourism : 31St सेलिब्रेशनसाठी गोव्यात आहात? येथे नक्की भेट द्या

गोवा हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथे लोक ख्रिसमस, 31st पार्टी आणि न्यू इअर सेलिब्रेशनसाठी येतात. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक जण या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पोहोचलेही असतील. गोव्यातील 31 डिसेंबर म्हणजे एक उत्सव असतो. येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज आपण जाणून घेऊयात गोव्यातील 31st नाईटला कुठे काय विशेष असते.

बीच पार्टी –

31 डिसेंबरला रात्री गोव्यातील किनारे जसे की बागा बीच, अंजुना बीच आणि कलंगुट बीच येथे नृत्यासह खास पार्टीचे आयोजन केले जाते. तुम्ही येथे 31st नाईटचा आनंद घेऊ शकता.

नाइट क्लब –

31St गोव्यात साजरा करताना गोव्यातील विविध नाईटक्लबचा आनंद घेता येईल. येथे संध्याकाळी म्युझिक, परफॉर्मन्स, डीजेचे आयोजन केले जाते.

बीच पार्टी –

शांत, निळाशार समुद्रकिनारी नववर्षाचे स्वागत करायचे असेल तर बीच पार्टीचा आनंद घ्या. गोव्यातील पणजी, मांडोवी येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येते.

क्रूझ पार्टी –

म्युझिक, डान्स आणि निसर्ग या तीनही गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर गोव्यातील क्रूझ पार्टी नक्की एन्जॉय करा.

रेस्टॉरंट्स –

31St गोव्यात साजरा करण्यासाठी फॅमिलीसोबत गेले असाल तर गोव्यातील मोठमोठ्या रेस्टॉरंट्सना भेट देऊ शकता. येथे फॅमिलीसोबत डिनर करता येईल.

तुम्ही गोव्यात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेले असाल तर गोव्यातील स्थानिक कार्यक्रम आयोजन, पर्यटन मंडळांची माहिती  ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळवू शकता.

हेही वाचा – Party Hangover : पार्टीचा हॅंगओवर कसा उतरवाल?

Comments are closed.